Uddhav Thackeray vs Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेतील फूट महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य नाही - केसरकर

आदित्य ठाकरेंच्या बदनामीबाबत राणेंवर आरोप केल्यानंतर केसरकर यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन युटर्न घेतला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : यापूर्वी उद्धव ठाकरे स्वतः भाजपसोबत युती करण्यासाठी तयार होते आत्ता आम्ही तेच केल आहे तर त्याला तुम्ही विरोध का करता? असा सवाल करत शिवसेनेतील फूट ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य नाही, असं विधान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (split in Shiv Sena is not fair for Maharashtra says Deepak Kesarkar)

केसरकर म्हणाले, "सेना आणि भाजप एकत्र येणार होते याचा मी साक्षीदार आहे. पण तुम्ही केलं तर चांगल आणि आम्ही केलं तर ते वाईट अशी भूमिका घेऊन चालणार नाही. कारण अशा प्रकारे जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी बांधली, मराठी माणसाच्या हितासाठी उभी केली त्यामध्ये आज जी फूट पडत आहे ती महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य नाही. त्यामुळं जी भूमिका तुम्ही घेतली होती त्यासाठी शिंदे गटाच्या एकाही आमदाराला दुषणं लावली जाता कामा नये, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे"

जेव्हा जेव्हा नारायण राणे मला भेटले तेव्हा मी त्यांच्याशी आदरपूर्वक वागलो. राणेंशी माझा वैयक्तिक कुठलाही वाद नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी वेळ आली तरी त्यांच्यासोबतही काम करण्यासाठी तयार आहे. माझ्या विधानाचा संदर्भ थेट राणेंशी जोडला जातो. त्यामुळं ज्याप्रकारे मी शरद पवारांबाबत कोणतही वक्तव्य पत्रकार परिषदेत न करण्याच ठरवलं आहे, त्याचप्रमाणं यापुढे मी राणेंचंही नाव पत्रकार परिषदेत घेणार नाही, असंही यावेळी केसरकर म्हणाले.

मी सार्वजनिक जीवनात काही पथ्ये पाळतो. एखाद्या विषयाच्या अनुषंगानंच बोललं पाहिजे, असं मला वाटतं. माझ्या मुद्द्याचं उत्तर अजूनही शिवसेनेनं द्यावं. महाराष्ट्राच्या जनतेनं देखील शिंदे गट आणि भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. कारण नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला लोकांनी पंसती दिली. त्यामुळं आता हीच युती पुढील विविध निवडणुकांमध्ये लोकांसमोर जाईल आणि जिंकेलही याची मला खात्री आहे, असं यावेळी दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Protest March : गोकुळमधील सत्तासंघर्ष पेटला; ९ नोव्हेंबरला सतेज पाटलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांनी षडयंत्र केल्याचा आरोप

Google Layoffs 2026: AI वर वाढता खर्च; ५ देशांतील कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याची ऑफर, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सत्ता मिळत नाही म्हणून कायदा बदलता का? गोकुळच्या सत्तासंघर्षावरून सतेज पाटील आक्रमक, कोरमचा मुद्दा उपस्थित करण्यावरून सरकारला सवाल

Ethanol Car: १००% इथेनॉलवर धावणारी Toyota Innova Hycross लवकरच होणार लाँच; नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती!

New Recharge Plan: फक्त ३५ रुपयांत दोन OTT प्लॅटफॉर्म! नवा रिचार्ज पाहून ग्राहकही थक्क, दिवाळीसाठी खास सुविधा काय?

SCROLL FOR NEXT