st
st sakal
महाराष्ट्र

संपानंतर लालपरीची ६१० कोटींची कमाई! दररोज २९ लाख प्रवाशांचा एसटीने प्रवास

तात्या लांडगे

सोलापूर : पाच महिन्यांच्या संपानंतर रस्त्यांवर धावू लागलेली लालपरी आता पहिल्याच महिन्यात फायद्यात आली. २२ एप्रिल ते ३० मे या ३९ दिवसांत लालपरीने तब्बल ६१० कोटींची कमाई केली आहे. दररोज सरासरी २९ लाख प्रवासी एसटी बसने प्रवास करीत असून त्यातून लालपरीचा साडेअठरा कोटी रुपये मिळत आहेत. कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संचित तोटा जवळपास १४ हजार कोटींवर आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक होऊ लागल्याने एक लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी देखील पैसे पुरत नव्हते. कोरोना काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनाची स्थिती बिकट झाली आणि त्यासाठी राज्य सरकारकडून मदत घ्यावी लागली. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळी व विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळात संप पुकारला. तो संप तब्बल पाच महिने सुरु राहिला. शेवटी न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करीत २२ एप्रिलपासून सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप मिटला आणि लालपरी पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरली. संप काळात अनेक प्रवाशांचे हाल झाले होते, परराज्यातील बसगाड्यांनी मोठी कमाई केली होती. अशावेळी लालपरीला रुळावर यायला खूप वेळ लागेल, अशी भीती वर्तविली गेली. पण, लालपरीने काही दिवसांतच पुन्हा एकदा गरूडझेप घेत पहिल्याच महिन्यात खर्चापेक्षाही अधिक उत्पन्न मिळविले आहे. पुढील चार वर्षे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देणार असल्याने लालपरीचा संचित तोटा कमी होऊन महामंडळ पुन्हा उर्जितावस्थेत येण्यास मदत होणार आहे.

लालपरीच्या उत्पन्नाची स्थिती
२२ ते ३० एप्रिलपर्यंत
९६.१३ कोटी
१ ते ३० मेपर्यंत
५१४ कोटी
दररोजचे प्रवासी
२८.५४ लाख
दररोजची कमाई
१८.४१ कोटी

‘वायफाय’ सुरु करण्याचे नियोजन
लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमधील वायफायचा लाभ घेता यावा म्हणून काही वर्षांपूर्वी प्रत्येक बसमध्ये तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. प्रवाशांना एसटीतील वायफाय कनेक्ट करून मोबाईलवर काहीही पाहता येत होते. पण, सध्या ही संपूर्ण यंत्रणा बंद पडली आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ही सेवा पुन्हा एकदा सुरु केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Latest Marathi News Update : दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

Pune Fraud News : आयटी अभियंता तरुणीच्या नावावर परस्पर उचलले ४५ लाखांचे कर्ज; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai News : मानखुर्द येथील विषबाधा प्रकणी अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; गर्जना संघटनेची मागणी

SCROLL FOR NEXT