st bus sakal
महाराष्ट्र बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर लालपरी रुळावर! दीड महिन्यातच ५२१ कोटींची कमाई

पाच महिने जागेवर थांबलेली लालपरी २२ एप्रिलनंतर राज्यभर सुसाट धावू लागली आहे. मागील दीड महिन्यात ५२१ कोटींची कमाई करून खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा अजूनही तितकाच विश्वास असल्याचे लालपरीने सिध्द केले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पाच महिने जागेवर थांबलेली लालपरी २२ एप्रिलनंतर राज्यभर सुसाट धावू लागली आहे. मागील दीड महिन्यात ५२१ कोटींची कमाई करून खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा अजूनही तितकाच विश्वास असल्याचे लालपरीने सिध्द केले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीन करा, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी तब्बल पाच महिने लढा दिला. विलीनीकरण झाले नाही, पण वेतनवाढ आणि पगाराची शाश्वती कर्मचाऱ्यांना मिळाली. २२ एप्रिलपासून बहुतेक कर्मचारी कामावर हजर झाले असून सध्या ९१ हजार कर्मचारी रुजू झाले आहेत. लालपरीवरील प्रवाशांचा विश्वास उडाला असून पुन्हा लालपरी उभारी घेऊ शकणार नाही, असा काहींचा अंदाज होता. पण, काही दिवसांतच लालपरी पुन्हा सुसाट धावू लागली आहे. २२ एप्रिलनंतर सुरवातीला साडेबारा हजार बसगाड्या मार्गांवर धावत होत्या आणि दररोजचे उत्पन्न साडेतेरा कोटींपर्यंत होते. पण, १५ दिवसांची ही स्थिती बदलली आणि दररोज १४ हजार बसगाड्या मार्गांवर धावत असून दररोजचे उत्पन्न १७ कोटींवर पोहचले आहे. १ एप्रिल ते १५ मे या दीड महिन्यांतच लालपरीला ५२१ कोटींचे उत्पन्न मिळाले. कर्मचारीही उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून पगार वेळेत होईल हा त्यामागील हेतू आहे. खासगी वाहनांचे दर परवडणारे नसल्याने गावापर्यंत येणाऱ्या लालपरीचाच सर्वसामान्यांना मोठा आधार आहे. मागील १५ दिवसांत प्रवाशांची संख्या वाढल्याने मार्गांवर धावणाऱ्या बसगाड्यांमध्ये सोळाशेंची वाढ झाली आहे. दुसरीकडे या १५ दिवसांतच लालपरीला २२९ कोटींपर्यंत उत्पन्न मिळाले आहे.

‘प्रवासी मित्र’द्वारे उत्पन्नवाढीचा प्रयत्न
पाच महिन्यांच्या संपामुळे घटलेली प्रवाशी संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने ‘प्रवासी मित्र’ ही संकल्पना सुरु केली आहे. राज्यातील बहुतेक गावांपर्यंत पोहचलेली लालपरी खडतर मार्गावर प्रवास करताना आता पुन्हा एकदा सुसाट धावू लागली आहे. प्रवासी वाढावेत म्हणून आता एसटी स्टॅण्डपासून जवळच असलेल्या खासगी वाहनांच्या थांब्याजवळील प्रवाशांना एसटीने जाण्यासंबंधी आवाहन केले जाते. त्याचाही मोठा फायदा होत आहे, अशी माहिती सोलापूरचे विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी दिली.

लालपरीचे उत्पन्न
दररोजची सरासरी कमाई
१६.८४ कोटी
मार्गांवरील बस
१३,३६५
१ ते ३० एप्रिलपर्यंतचे उत्पन्न
२९६ कोटी
१ ते १५ मेपर्यंतची कमाई
२२९ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT