ST Employee Strike google
महाराष्ट्र बातम्या

आमचे मालक सदावर्ते, कृती समितीसोबत देणंघेणं नाही - कर्मचारी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Employee Strike) तोडगा काढण्याच्या उद्देशाने आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांच्यासोबत कृती समितीची बैठक झाली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचं आवाहन करण्यात आलं. पण, आमचे आणि बैठकीचे काहीही देणंघेणं नाही, असं म्हणत कर्मचारी संपावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं.

'आम्हाला विलनीकरण हवं' -

कृती समितीसोबत घेतलेल्या बैठकीसोबत आमचे काहीही देणेघेणे नाही. त्या बैठकीला आमचे वकील गुणरत्न सदावर्ते उपस्थित नव्हते. ज्यांना आम्ही संपातून बाहेर काढले त्या रिकाम्या लोकांसोबत सरकारने बैठक घेतली. आम्हाला विलनीकरण हवं आहे बाकी काहीही नको, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली.

बैठक घ्यायची असेल तर सदावर्तेसोबत घ्या -

कृती समितीचे सदस्य अजय गुजर यांनी गुणरत्न सदावर्ते यांची वकीली मागे घेतली असल्याची माहिती दिली. त्याबाबत बोलताना कर्मचारी म्हणाले, आम्ही १ लाख कर्मचाऱ्यांनी सदावर्ते यांना निवड आहे. कृती समितीचे आमची पुढारी म्हणून वागू नये. आमच्या कर्मचाऱ्यांचा जीव गेल्यानंतर यांना बैठक घेण्याची जाग आली का? बैठक घ्यायची असेल तर सदावर्ते यांच्यासोबत घ्या. आमचे मालक फक्त न्यायालय आणि सदावर्ते आहेत, असंही कर्मचारी म्हणाले. तसेच त्यांनी सरकार आमिष दाखवत असल्याचा आरोप केला.

कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचं आवाहन -

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती कृती समितीने दिली. आम्ही २० डिसेंबरला संप मागे घेतला होता. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश अडचणी सोडवलेल्या आहेत. लवकरच बैठक घेऊन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगारावर चर्चा होणार आहे. आता शरद पवारांनी शब्द दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि कामावर परतावं, असं आवाहन अजय गुजर यांनी केलं. तसेच त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर देखील टीका केली. कर्मचाऱ्यांना भडकविण्याचं काम सुरू असून सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे कर्मचाऱ्यांची रोजीरोटी बंद होण्यीची वेळ आली आहे, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT