Chandrakant Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

"संप मिटेपर्यंत कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांची जबाबदारी भाजपची"

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोल्हापूर : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Emplyoee) संप अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. कोल्हापुरातील कर्मचारीही अद्याप संपावर ठाम आहेत. पण संपात सहभागी झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. यापार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची चूल पेटवण्याची जबाबदारी भाजपाची आहे, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे काय हाल सुरु आहेत, हे या निर्दयी ठाकरे सरकारला कळणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. (ST Strike BJP is responsible for families of Kolhapur ST workers till end of strike)

पाटील म्हणाले, सगळ्याच बाजूंनी आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत आहोत. मी इतके निर्दयी सरकार कधीही पाहिलेले नाही. सरकार निर्दयी आहे कारण त्यांना काही कळतंच नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर घराबाहेरच पडत नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एक मिनिटदेखील स्थिर बसत नव्हते.

महाविकास आघाडी सरकार जागं होईल आणि तुमच्या मागण्या पूर्ण करेल, असं मला वाटत नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे काय हाल चालले आहेत, हे तरी सरकारला लवकर कळू दे. मी वारंवार हे म्हटलं आहे की, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा तरी द्या. ते सुद्धा यांच्याकडून होत नाही, असंही पाटील म्हणाले.

दरम्यान, पाटील पुढे म्हणाले, "झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय माझ्या आई-वडिलांनी मला लावली आहे. त्यामुळे हा संप मिटेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची चूल पेटवण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आहे, अशी मी घोषणा करतो"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT