st strike esakal
महाराष्ट्र बातम्या

ST strike: शिष्टमंडळाची अनिल परबांशी चर्चा; काय घडलं बैठकीत?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: एसटी संपाच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. एक महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर बोलताना अनिल परब यांनी म्हटलंय की, एसटीच्या संपाची ज्या युनियने नोटीस दिली होती त्या संघटनेचे अध्यक्ष गुजर, वकील सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्यासोबत बैठक झाली. विलीनीकरणाचा मुद्दा त्यांनी उचलला. त्यांच्याशी चर्चा करताना मी त्यांना हायकोर्टाच्या त्रीसदस्यीय कमिटीची आठवून करुन दिली. हायकोर्टाचे निर्देश दिलेले असताना मला त्याच्यात फेरफार करता येणार नाही. कमिटीचा अहवाल आल्यावर सरकार त्यावर सकारात्मक विचार करेल. ऍडव्होकेट जनरलशी मी बोलेन, असंही म्हणालो. मात्र, संप मागे घ्या. विलीनीकरणाची प्रक्रिया एकदोन दिवसांत होत नाही. त्याव्यतिरिक्त मुद्यांवरही चर्चा करायला तयार आहे, मात्र संप मागे घ्या. चर्चा करुया, असं परब यांनी म्हटलंय.

पुढे ते म्हणाले की, मी 72 हजार लोकांचं प्रतिनिधीत्व करतोय, असं मला ते म्हणाले, मी त्यांना म्हणालो की, सरकार कोणत्याही कर्मचाऱ्याचं नुकसान करु इच्छित नाही. लोकांना सेवा देण्यासाठी आम्ही बांधिल असल्याने पर्यायी व्यवस्था उभी करावी लागेल. पेक्षा हा संप ताणवू नका, असं मी सांगितंलय. सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेतलेली नसून संवेदनशीलताच दाखवली आहे.

परब म्हणाले की, आंदोलन करणं त्यांचा अधिकार आहे. परंतु कुणाच्या तरी सांगण्यावरुन त्यांनी कसलीही कृती करु नये. जे भडकवत आहेत, ते नुकसान झाल्यावर मदतीला येत नाहीत. राजकारण करण्यासाठी जे भडकवत आहेत, कामगारांनी त्यांच्यामुळे स्वताच नुकसान करुन घेऊ नये. मी कामगारांशी लढा देऊ इच्छित नाही, ते माझेच कामगार आहेत, एसटीचे कामगार आहेत. भावना भडकलेल्या असताना चुकीचं पाऊल उचलू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT