Ajit Pawar on ST Employee Strike Esakal
महाराष्ट्र बातम्या

ST कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण शक्य नाही; अजित पवारांचं स्पष्टीकरण

गुढीपाडवा शोभायात्रांया मार्ग आज मोकळा होणार? अजित पवार म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांना आंदोनल सुरु आहे. मात्र कर्मचाऱ्यांना दिलेली मुदत आज संपणार आहे. (ST Strike) कर्मचाऱ्यांचे पगारही वाढवले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण शक्य नाही. कोर्टाने दिलेली मुदत संपली ती कारवाई करु असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. आज मुंबईत ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee) दिलेली मुदत आज संपणार आहे. मी आधीच सांगितलं होतं ३१ मार्चपर्यंत सगळ्यांना संधी द्या. आता तशा प्रकारची संधी दिली आहे. उद्यापासून कठोर भूमिका घेतली जाणार आहे. वेळ पडल्यास कर्मचाऱ्यांना काढून टाकून नवीन भरती केली जाऊ शकते. बेस्ट, पीएमपीएलने इलेक्ट्रॉनिक आणि सीएनजी बसेस कंत्राटवर घेतल्या आहेत. एका कंपनीने पीएमपीएलने चालवायला घेतल्या आहेत. त्याचा खर्चही कमी होतो आणि प्रवाशांचा फायदा होत, असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारने कोणताही निर्णय घेतला आणि न्यायव्यवस्थेनं निकाल दिला तर न्यायव्यवस्था सर्वोच्च असेल. त्यांनीही दिलेली मुदत संपली तर पुन्हा कठोर कारवाई करण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला असतो, असंही पवार यांनी म्हटलं आहे. (Ajit Pawar on ST Employee Strike)

कोरोना निर्बधांविषयी ते म्हणाले, गुढीपाडवा शोभायात्रा यांचा आज मार्ग मोकळा होणार का या संबंधित आज चार वाजता राज्य मंत्रिमंडळाची होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) जो निर्णय घेतील त्यानंतर सगळं स्पष्ट होईल. या बैठकीत कोरोना निबंध यावर चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आज चार वाजता यावर निर्णय होणार असल्याते त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT