Maharashtra Government Employees Strike esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Government Employees Strike: राज्य सरकारी कर्मचारी 14 पासून संपावर

सकाळ वृत्तसेवा

Government Employees Strike : राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांनी त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर १४ डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

या संदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना, तर सरकारी निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले. (State government employees on strike from 14 december news)

मार्च २०२३ ला सरकारी कर्मचारी शिक्षकांनी त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाचा इशारा दिला होता. मात्र संपादत मध्यस्थी होउन त्यात जुन्या पेन्शनच्या मागणीाबत शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

याशिवाय इतर विविध सतरा मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र शासनस्तरावर वेळ मिळावा, या हेतूने कर्मचारी कृती समितीने आंदोलन स्थगिती केले होते. त्यानंतरही शासनस्तरावर हालचाली होत नसल्याचा कर्मचारी संघटनेचा आरोप आहे.

शासनाच्या आश्वासनाला सहा महिने होऊनही कुठलाही निर्णय होत नसल्याने राज्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्यातील विविध विभागांतील १७ लाखांवर कर्मचारी आणि शिक्षक आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती सरकारी-निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वयक समितीचे निमंत्रक दिनेश वाघ, सरचिटणीस सुनंदा जरांडे, ‘टीडीएफ’ संघटनेचे नेते माजी आमदार नाना बोरस्ते, जिल्हा परिषद महासंघाचे अध्यक्ष अरुण आहेर, शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळू पाटील-बोरसे, महसूल संघटनेचे तुषार नागरे, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे राजेंद्र आहिरे, विजय हळदे आदींनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT