Bacchu kadu Latest News google
महाराष्ट्र बातम्या

...तर शेवटच्या पाच मिनिटांत निवडणूक मारणार; बच्चू कडूंचा इशारा

राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला सूचक इशारा केला आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुका चार दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. याचदरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सूचक इशारा दिला आहे. धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारने केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम राज्यसभेच्या निवडणुकांवर दिसून येतील असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

(Bacchu Kadu On Rajyasabha Election)

केंद्राने हरभऱ्याची खरेदी सुरू करावी त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी अन्यथा राज्यसभेसाठी मतदान करणार नाही, आघाडीलासुद्धा शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू असा इशार बच्चू कडू यांनी दिला आहे. "संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख आहे आणि धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख इतकी आहे. आणि आता केंद्र सरकार माल खरेदी करण्यासाठी हात वर करत आहे." असं राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत.

"यासंदर्भात मुंख्यमंत्री आणि शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली पाहिजे. आणि केंद्र सरकारने खरेदी नाही केली तर एका हेक्टरला जार हजार रूपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला पाहिजे नाहीतर राज्यसभेची निवडणूक आम्ही शेवटच्या पाच मिनिटांत मारणार आहोत." असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. दरम्यान १० जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका पार पडत असून त्यामध्ये सातव्या उमेदवारासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. याचदरम्यान बच्चू कडू यांनी अशा इशारा केल्यावर राज्य सरकार काय पाऊले उचलणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT