pesa act
pesa act  Sakal
महाराष्ट्र

आरक्षण : ओबीसी आयोगाचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यानंतर आता राज्य ओबीसी आयोग कामाला लागला असून, उद्यापासून आठ दिवस राज्यातील विविध विभागात दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याची सुरुवात पुण्यापासून केली जाणार आहे. (OBC Reservation News)

दौऱ्याच्या सुरुवातीला ओबीसी आयोगातील कर्मचारी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांना भेटणार आहेत. त्याशिवाय या आठ दिवसीय दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाबाबत आवश्यक माहिती गोळा केली जाणार आहे.

असा असणार दौरा

ओबीसी आयोगाचा राज्य दौरा 21 मे रोजी पुण्यापासून सुरु होईल, 22 मे औरंगाबाद, 25 मे नाशिक, 28 मे कोकण विभाग या दौऱ्यामध्ये विदर्भाबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रालाही न्याय मिळेल : छगन भुजबळ

महाराष्ट्रातील ओबीसींचा प्रश्‍न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्राला न्याय मिळेल, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित ओबीसी आयोगाची स्थापना करून ओबीसींचा ‘इम्पिरिकल डेटा जमा करण्याचे काम चालू केले आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही त्यांची भेट घेऊन लवकर डेटा देण्याची मागणी केली. सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत निवडणुका होऊ शकत नाही. हा डेटा जमा करून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण पूर्ववत होईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT