Narayan Rane-Nitesh Rane in Disha Salian death Case esakal
महाराष्ट्र बातम्या

राणे पिता-पुत्रांना दिशा सालियान प्रकरण भोवणार? महिला आयोग करणार कारवाई

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिशा सालियान मृत्यूप्रकरणात (Disha Salian Death Case) वारंवार आरोप केले आहेत. याप्रकरणी आता दिशा सालियानच्या आई-वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानुसार महिला आयोग राणे पिता-पुत्रांविरोधात कारवाई करणार असल्याचे आयोगाच्या सदस्यांनी सांगितले.

दिशाच्या आई-वडिलांनी महिला आयोगाकडे लेखी तक्रार दिली आहे. यामध्ये नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या नावासह सोशल मीडियावर ज्या बातम्या पसरवल्या जातात त्याचा उल्लेख आहे, असं राज्य महिला आयोगाच्या सदस्या सुप्रदा फातर्फेकर यांनी सांगितले.

महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारीची आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे. या पालकांना जगू द्या. त्यांना कुणीही त्यांना त्रास देऊ नका. वारंवार दिशाच्या नावाची बदनाम केली जात आहे. या पत्रात ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, असं राज्य महिला आयोगाच्या सदस्या गौरी छाब्रिया म्हणाल्या. त्यामुळे आता नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियान मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप नारायण राणेंनी केला होता. त्यानंतर दिशाचं मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून दिशाची बदनामी केली जात असल्याचं म्हटलं. आज परत महापौरांनी दिशाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी आमच्या मुलीची बदनामी करू नका, अशी विनंती केली. तसेच राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली. यामध्ये नारायण राणे आणि नितेश राणे या दोन्ही पिता-पुत्रांचे नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dams Water Level : पुणेकरांसाठी मोठी बातमी! चारही धरणे 100% भरली; पण आज 'या' भागात पाणीच नाही

Farmer Accident Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अपघात सुरक्षा योजनेत आता संपूर्ण कुटुंबाला संरक्षण, 2031 पर्यंत मुदतवाढ

Mumbai Local Train Viral Video : माथेफिरुने रोखली लोकल ट्रेन, धाडसी प्रवाशामुळे टळली मोठी दुर्घटना; रुळांवरचा थरार कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Gold Rate Today: RBI च्या निर्णयानंतर ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 10 ग्रॅमचा ताजा भाव किती?

Kolhapur Flood: हिप्परगी, आलमट्टीत पाणी साठ्याचे निकष धाब्यावर; ‘आंदोलन अंकुश’च्या पाहणीत स्पष्ट, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महापुराचे संकट

SCROLL FOR NEXT