मुंबई : जुन्या पिढीतल्या अनेक प्रसिद्ध लावण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगांवकर यांची परिस्थिती सध्या बिकट बनली आहे. याची दखल आता राज्य महिला आयोगानं घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. (State Women Commission takes cognizance about Tamasha artiste Shantabai Kopargaokar)
चाकणकर यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं, "तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर या ज्येष्ठ मराठी कलाकारावर उतारवयात दयनीय अवस्थेत राहण्याची वेळ आली आहे, अशा आशयाच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या आहेत. आयोगाच्या वतीनं तातडीनं जिल्हा महिला बालविकास अधिकारी अहमदनगर यांना संपर्क करण्यात आला आहे"
"सध्या शांताबाई नगरच्या एका रुग्णालयात आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांची महिला बाल विकास विभागामार्फत वृद्धाश्रमात व्यवस्था करावी असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनानं कलाकारांच्या निवृत्ती वयात त्यांना समाधानानं जगता यावं यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत.
शांताबाईंना राज्य शासनाच्या योजनांमधून सन्मानजनक मानधन मिळावं, निवृत्ती वेतन मिळावं यासाठी आयुक्त, महिला बाल विकास यांना पत्र लिहून शांताबाईंना मदत मिळवून देण्यासाठीचे निर्देश आयोग देत आहे," असं रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. कोपरगावच्या बस स्थानकांत त्या एखाद्या भिक्षेकऱ्यासारख्या दिसून आल्या. त्यांना रहायला घर नाही केवळ एक गाठोडं घेऊन ते या बस स्थानकात आपलं जीवन व्यतीत करत आहेत. (Latest Marathi News)
अंगावर फाटके कपडे आणि भुरके केस यामुळं त्यांची दयनीय अवस्था पाहवत नाही. एका महिला कलाकारानं महाराष्ट्राची सांस्कृतीक अस्मिता असलेल्या लावणीवर जीवापाड प्रेम केलं. आपल्या कलागुणांनी ती टिकवली, समृद्ध केली, अशा कलाकारावर ओढवलेल्या बिकट परिस्थितीच्या बातम्या मराठी मीडियानं केल्या. त्यामुळं शांताबाई कोपरगावर अचानक चर्चेत आल्या. (Marathi Tajya Batmya)
३०-४० वर्षांपूर्वी शांताबाई कोपरगावकर यांनी आपल्या नृत्यानं उत्तर महाराष्ट्र, खान्देश गाजवला. भीका सांगवीकर, शंकरराव खर्डीकर असे तमाशाचे फड त्यांनी गाजवले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.