Sharad Pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : 'पवार साहेब, या थोबाडांना आवरा'; शिंदे गटाच्या आमदाराचं आवाहन

महापुरुषांचा अवमान खपवून घेणार नसल्याचं सांगत पवार साहेब, या थोबाडांना आवरा, असं आवाहन

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं त्यावरून राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. तर औरंगजेबाने विष्णूचं मंदिर पाडलं नव्हतं, असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटलं आहे. या दोन्ही नेत्यांना सत्ताधाऱ्यांनी नेत्यांनी घेरलं आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी महापुरुषांचा अवमान खपवून घेणार नसल्याचं सांगत पवार साहेब, या थोबाडांना आवरा, असं आवाहन शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे.

औरंगजेबाने भारतावर अनेक वर्ष राज्य केलं. राज्य मिळवण्यासाठी त्याने आपल्या सख्या मोठ्या भावाचा गळा कापला. स्वत:च्या वडिलांना तुरुंगात टाकलं. सर्व भावांना जीवे करून त्याने गादी बळकावली. त्याने काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडण्याचं फर्मान सोडलं. जगात झालं नाही एवढं धर्मांतर औरंगजेबाने करून घेतलं. तरीही तो क्रूर नाही असं कसं म्हणता? असा प्रश्न संजय गायकवाड यांनी केला आहे.

औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांचे हाल हाल केले. संभाजी महाराजांच्या कानात शिसं ओतलं, डोळ्यात गरम सलाखे टाकले, जीभ छाटली, नखं कापली आणि अंगावरची सालटी काढली. हालाहाल करून संभाजीराजेंची हत्या केली. तरी पण तो क्रूर नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते म्हणतात. या नेत्यांना लाज वाटत नाही. एवढ्या क्रूरपणे वागणाऱ्या औरंगजेबाला ते चांगला असल्याचं सर्टिफिकेट देतात. असं करून ते आमच्या थोर राजांचा अपमान करत आहेत, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.

छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. त्यांना स्वराज्य रक्षक म्हणा. धर्मवीर म्हणू नका, असं आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं. अजितदादांच्या या विधावरून भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरवात केली. काल या व्यक्तव्याप्रकरणी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. मी कधीच महापुरुषांबाबात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. मला विरोधीपक्ष नेते हे पद राष्ट्रवादीने दिलेलं आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असं ते म्हणाले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.

मी कधीच महापुरुषांबाबात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. मला विरोधीपक्ष नेते हे पद राष्ट्रवादीने दिलेलं आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा स्वतंत्र्य अधिकार असतो असं अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tivsa News : परंपरागत गाई-म्हशीच्या खेळाला गालबोट, दगडफेक आणि रोषाचे वातावरण; तिवसा येथे पोलिसांचा बळाचा वापर

Viral Video : पठ्ठ्याने मंत्रानेच फोडले फटाके, पाहून लोक झाले आश्चर्यचकित, अजब व्हिडिओ होतोय व्हायरल

MNS Deepotsav Controversy : ‘’दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत, हे दाखवण्यापर्यंत सरकार...’’ ; मनसेचा आरोप!

RBI Reforms: मोठी बातमी! बँकिंग कायदे बदलणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच मोठी घोषणा करणार, नवीन तरतुदी काय असणार?

ZIM vs AFG : झिम्बाब्वेचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय! Blessing Muzarabani ने मोडला मोहम्मद सिराजचा विक्रम

SCROLL FOR NEXT