Ashish Shelar
Ashish Shelar esakal
महाराष्ट्र

'हिंदुस्थानी भाऊला अटक करुन तुमची यातून सुटका होणार नाही'

सकाळ डिजिटल टीम

दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षांना विद्यार्थ्यांकडून विरोध होताना दिसतोय.

दहावी आणि बारावीच्या (10th and 12th Board exams) ऑफलाइन परीक्षांना (Offline Exams) विद्यार्थ्यांकडून विरोध होताना दिसतोय. मुंबई, पुणे (Pune), नागपूर (Nagpur) आणि अकोल्यासह काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. त्यामुळं आता पुन्हा एकदा राज्य सरकारसमोर आव्हान निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. यावरती भाष्य करताना भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधलाय.

भाजप नेते शेलारांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, 11 हजार कोटींच्या प्रीमियमची खैरात बिल्डरांवर करणाऱ्या ठाकरे सरकारनं विद्यार्थ्यांची फी माफ करायला हरकत नाही. शिवाय, परीक्षांबाबतचा असंतोष विद्यार्थी रस्त्यावर येऊन सांगत आहेत, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला हरकत नाही. तसेच हिंदुस्थानी भाऊला (Hindustani Bhau अटक करुन तुमची यातून 'सुटका' होणार नसल्याचंही स्पष्ट मत शेलारांनी व्यक्त केलंय.

ऑफलाइन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थी रस्त्यावर उतरुन करत आहेत. वर्षभर ऑनलाइन शिकवलं, तर मग परीक्षाही ऑनलाइनच घ्या. तुम्ही वर्षभर ऑनलाइन शिकवता आणि ऑफलाइन परीक्षा घेता, हे योग्य नाही. त्यामुळं परीक्षा रद्द करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरलीय. त्यामुळं राज्य सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. यावरती लवकरात-लवकर तोडगा काढला जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT