Subhash-Desai 
महाराष्ट्र बातम्या

मी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाही : सुभाष देसाई

मी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाही.

माधव इतबारे

औरंगाबाद : मी उमेदवार ठरविणारा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत बसून निर्णय घेतो. यावेळी मी विधान परिषदेची निवडणूक लढणार नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (ता.आठ) सांगितले. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून शिवसेनेकडून दोन जागांसाठी उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे (Aurangabad) पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) मुंबईतील सचिन अहिर व आमसा पाडवी यांची नावे चर्चेत होती. (Subhash Desai Says, I Won't Contest Legislative Council Election)

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुभाष देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यसभा निवडणुकी संदर्भात ते म्हणाले, महाविकास आघाडी भक्कम असून, आमच्या चारही जागा निवडून येतील. भाजपने आणखी एक उमेदवार टाकून अपशकून करण्याचा प्रयत्न केला आहे. २४ वर्षांत राज्यसभेची कधी निवडणूक झाली नाही. सर्व निवडणूका बिनविरोध झाल्या.

राजकीय वातावरण चांगले खेळीमेळीचे असावे. यासाठी आम्ही पुढाकार घेतला. शिष्टमंडळाने भाजप नेत्यांची भेट घेतली. पण भाजपला वातावरण नासवून टाकायचे आहे. त्यामुळे त्यांनी आणखी एक उमेदवार दिला, असा आरोप देसाई यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Global Politics: अमेरिकेतील निकालांमुळे 'उजव्यां'ना धक्का? 'जागतिक राजकारणात अति-उजव्या लाटेचा प्रभाव ओसरतोय..!' कोणी केला दावा?

Diwali Child Health: फटाक्यांचा धूर हिरावून घेऊ शकतो मुलांची दृष्टी; दिवाळीत मुलांच्या आरोग्याची अन् डोळ्यांची 'अशी' घ्या काळजी...

Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेच्या विजयी मिरवणुकीत राडा! पंचायत समिती सदस्याला मारहाण, नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : धुळ्यात नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू असतानाच अचानक स्लॅब कोसळला

दिवाळीनंतर या ५ राशींचं नशीब चमकणार! शुक्र मार्गी होताच आर्थिक अडचणी दूर होणार

SCROLL FOR NEXT