महाराष्ट्र

Bhushan Desai: "...आणि आता तो पावन झाला", सुभाष देसाईंच्या मुलावरून खडसेंचा सरकारवर हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

सुभाष देसाई हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाईंच्या पक्ष प्रवेशाचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. (subhash desai son bhushan desai join shinde camp Eknath Khadse devendra fadnavis vidhan parishad)

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी भूषण देसाई यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचं कारण सांगत शिवसेना-भाजपा सरकारला घेरले.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

भूषण देसाई यांनी वडिलांची साथ का सोडली? अनेक वर्ष त्यांनी MIDC चं काम अप्रत्यक्षपणे सांभाळले. पण एकाएकी असं का वाटले. त्याचे कारण म्हणजे भूषण देसाई यांचे ४ लाख १४०० स्क्वेअर मीटर औद्योगिक भूखंडाचे अवैध वाटप केले.

अजित पवारांनी खरडपट्टी काढल्यावर देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी, म्हणाले...

त्यात जवळपास ३ हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी करत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.

यावर उद्योगमंत्र्यांनी उच्चस्तरीय कमिटी स्थापन करून चौकशी अहवाल तयार केला जाईल असं म्हटलं होते. आज तो अहवाल सभागृहात मांडण्यात येणार आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.

तसेच याच भूषण देसाईंबाबत खासदार इम्तियाज जलील, आमदार अतुल भातखळकर यांनी जमीन घोटाळ्याचा आरोप केला. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला.

उच्चस्तरीय समिती नेमली. भाजपा आमदार मागे लागले. चौकशी सुरू झाली. सुभाष देसाईंचा मुलगा आहे. विरोधी पक्षाचे ते नेते आहे म्हणून ही पाऊले उचलली.

आता हे प्रकरण ईडीकडे जाणार आहे असा निरोप भूषण देसाईंकडे पाठवला. पण तो आता पावन झाला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या आश्रयाखाली आला. तुमच्याकडे आला तर सगळं संपलं. माझ्यावर भूखंडाचे आरोप झाले.

Kapil Sibal: तुम्ही अजूनही तरुण वकील आहात सिब्बलजी; न्यायमूर्तींची मिश्किल टिप्पणी

एक रुपयाचा माझा संबंध त्याच्याशी नाही. तरी माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला. मला लावलेला न्याय तोच भूषण देसाईंना लावणार का असा संतप्त सवाल एकनाथ खडसेंनी सभागृहात सरकारला विचारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT