Mungantiwar Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

देव करो तुम्हाला पुढचं बोधचिन्ह 'खंजीर' मिळो; मुनगंटीवारांचे ठाकरेंना चिमटे

उद्धव ठाकरेंच्या मुलाखत म्हणजे एका हताश झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांकडून जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी केलेला असफल प्रयत्न आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray : राज्यातील राजकीय बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोरी करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक टिकेदरम्यान पाठीत खंजीर खूपसल्याचे म्हटले. या दोघांच्याही या शब्दावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना मिश्किल चिमटा काढत देव करो तुम्हाला पुढचं बोधचिन्ह खंजिरच मिळो अशी इच्छा व्यक्त केली आहे.

मुनगंटीवर म्हणाले की, महाराष्ट्र तोडणार हे वाक्य खूप जुने झाले असून, अशा प्रकरची वाक्यं केवळ आणि केवळ सहानुभूती घेण्यासाठी बोलली जात आहेत. मुंबई तोडण्याचे महापाप तर काँग्रेसचेच असून, तुम्ही अजुनही काँग्रेसच्या मांडीवर असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीबाबत ते म्हणाले की, ही मुलाखत पारिवारिक होती. तसेच हा एका हताश झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांकडून जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी केलेला असफल प्रयत्न आहे.

फिस्क मॅच मी बघत नाही - फडणवीस

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. ते म्हणाले की, "फिक्स मॅच मी बघत नाही. मी लाईव्ह मॅच बघत असतो. जेव्हा पुढे काही होईल तेव्हा मी त्यावर प्रतिक्रिया देईन."

दरम्यान, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत भाजपा तसंच बंडखोर आमदारांवर सडेतोड टीका केली आहे. सडलेला पालापाचोळा आहे, जो आत्ता पडतोय, तो एकदा शांत झाला की सगळं सत्य समोर येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर भाजपा आमदार आशिष शेलारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्र्यांना पालापाचोळा म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT