Sharad-Pawar
Sharad-Pawar 
महाराष्ट्र

साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे यावे - पवार

सकाळवृत्तसेवा

मुंबई - अडचणीतील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने साडेपाच हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. साखर निर्यातीसाठी वाहतूक अनुदान मिळणार असल्याने कारखान्यांनी आता मागे राहू नये. बाजारातील संधी लक्षात घेऊन कारखान्यांनी साखर निर्यातीसाठी पुढे यावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे केले.

राज्यातील साखरेचा उपलब्ध साठा आणि साखर निर्यातीच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना पवार यांनी केंद्राच्या निर्णयामुळे साखर उद्योगाला होणाऱ्या फायद्याची माहिती दिली. केंद्र सरकारने ५० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील १८५ कारखान्यांना १५.५८ लाख मेट्रिक टन एवढा कोटा देण्यात आला आहे. साखर निर्यातीसाठी केंद्राकडून प्रती टन ८ हजार ३१० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे देशात साखर विक्री करण्यापेक्षा साखरेची निर्यात करणे परवडणारे आहे, असे पवार यांनी सांगितले. यंदा ब्राझील, थायलंडमध्ये साखरेचे उत्पादन घटणार आहे.

आडमुठी भूमिका नको
केंद्राने साखर उद्योगाला दिलासा देणारे पॅकेज जाहीर केले असताना राज्य सहकारी बॅंकेने कारखान्यांबाबत आडमुठी भूमिका घेऊ नये, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. बैठकीत उसावर आलेल्या हुमणी रोगाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून उपाययोजना करून घेण्याचे ठरले. तसेच इथेनॉलबाबत पुण्याच्या साखर संकुलात बैठक घेण्याचे यावेळी मान्य करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT