Sujat Ambedkar Sujat Ambedkar
महाराष्ट्र बातम्या

‘अगोदर हनुमान चालिसा अमित ठाकरेंना म्हणायला लावा’

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील शिवाजी पार्कवर शनिवारी मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यात सर्वाधिक चर्चेचा विषय मशिदीवरील भोंगे होता. त्यांनी भोंगे न काढल्यास हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचे सांगितले होते. याला सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी आव्हान दिले. अगोदर हनुमान चालिसा अमित ठाकरे यांना म्हणायला लावा, असे ते म्हणाले.

मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी आहे. मशिदींवरील भोंग्याबाबत आधीही बोललो होतो. परंतु, ते अद्यापही सुरूच आहे. प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र, भोंगे काढावे (Remove masjid speaker) लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावाच लागले. अन्यथा आम्ही भोंग्यांविरोधात दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाचवू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी दिला होता.

याच्या दुसऱ्या दिवशी सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे (Raj thackeray) यांना आव्हान दिले. मी तुमच्या विधानासोबत आहे. अगोदर राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा. दंगली झाल्यास पोलिसांना माहिती आहे कोणाला पकडायचे आहे. हनुमान चालिसाचे पठण करताना मला एकही बहुजन पोरगा तिथे दिसायला नको, असेही सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) म्हणाले.

जितकेपण लोक हनुमान चालिसा म्हणणार आहे त्यांनी टीशर्ट काढून जाणव दाखवून हनुमान चालिसा म्हणून दाखवावी. मग बघू कोण हनुमान चालिसेचे पठण करतो, असेही ते म्हणाले. हिंदू-मुस्लिमांच्या दंगलीवर तुमचा संपलेला पक्ष उभा करू नका, असेही सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) राज ठाकरे यांना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यातील विसंवाद काल पासून दूर होण्यास सुरुवात

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT