sujay vikhe esakal
महाराष्ट्र बातम्या

लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचं आहे, काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी : सुजय विखे

'काँग्रेस ही बिनबुलाये वऱ्हाडी. त्यांना कितीही बोलले तरी ते जेवणाचा ताट सोडत नाही.'

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. रोज दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरुच आहे. यात भाजपचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी उडी घेतली आहे. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) संसार असा आहे, की लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचे आहे. राष्ट्रवादी (NCP) नवऱ्याच्या भूमिकेत तर शिवसेना (Shiv Sena) मूक बायकोच्या भूमिकेत असून काँग्रेस (Congress Party) ही बिनबुलाये वऱ्हाडी असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला. त्यांना कितीही बोलले तरी ते जेवणाचा ताट सोडत नाही, अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली. (Sujay Vikhe Attack On Mahavikas Aghadi Over Politics In Ahmednagar)

ईडीच्या (Enforcement Directorate) कारवाईवर सुजय विखे म्हणाले की, आम्ही त्यांना चोऱ्या करायला सांगितलेले नाही. ज्यांनी चोऱ्या, भ्रष्टाचार केला आहे, त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. भ्रष्टाचार केला नसेल तर पुरावे द्यावे, टीव्हीवर बोलण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. ईडीने राज्यात महाविकास आघाडीविरोधात आघाडी उघडली काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईडीवर घरगडी असल्याची टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT