Thackeray Vs Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Thackeray vs Shinde : ठाकरे गटाची याचिका उद्यावर ढकलली, दुपारी 'या' वेळी होणार सुनावणी

सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला दिले. बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून काल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली तेव्हा काल ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाने फटकारले.अर्ज दाखल न करताच ठाकरे गटाने सुनावणीची विनंती केली होती. मात्र तातडीने सुनावणीची विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

मेन्शनिंग लिस्टमध्ये अर्ज दाखल करायला पाहिजे, लिस्टेड नसताना कोणतीही तारीख कोर्ट देऊ शकत नाही, असं कोर्टाने काल ठाकरे गटाला सुनावले होते. त्यानुसार आज सकाळी अकरा वाजता ठाकरे गट आपली याचिका दाखल केली. त्यावर आजच सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या 3.30 वाजता सुनावणी घेतली जाईल असं सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची याचिका उद्या दुपारी 3.30 वाजता ऐकणार असं सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे. दरम्यानच्या काळात घटनापीठाचे कामकाज मात्र सुरू राहणार आहे. आयोगाविरोधात याचिका कोर्टाने ऐकू नये, त्यांना हायकोर्टानेही दोन वेळा नाकारले असा दावा शिंदे गटाने केला आहे उद्या स्थगिती मिळणार की नाही? यासंबधीची माहिती समोर येईल.

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवरती सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी पार पडणार आहे. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचं याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. आता 3 दिवसांच्या सुनावणीत ते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. गेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT