Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये सुप्रिया सुळे झाल्या भावूक; अजित पवारांना यासंबधी प्रश्न विचारल्यावर...

'खुपते तिथे गुप्ते' मध्ये सुप्रिया सुळे भावूक झाल्या त्यावर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता

अंकिता खाणे (Ankita Khane)

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटींसोबत अनेक राजकीय नेते देखील हजेरी लावतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत गुप्ते करतो. नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानंतर लगेचच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये सुप्रिया सुळे भावूक झालेल्या दिसून आल्या आहेत.

'खुपते तिथे गुप्ते शो' च्या या प्रोमोत मंचावर सुप्रिया सुळेंची एन्ट्री होते. एकवेळ कुटुंबातील माणसं साथ सोडतील, पण त्यांच्या आठवणी कधीच साथ सोडत नाहीत, अशी ओळ मागे ऐकायला येते. सुप्रिया सुळेंना अजितदादांचा फोटो दाखवण्यात येतो. यावेळी दादांचा फोटो पाहून सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी येतं.

हे बघून अवधूत गुप्ते म्हणतात, "तुम्ही कार्यक्रमाच्या आधी आम्हाला म्हणाला होता, की मी कोणासमोर भावना उघड करु शकत नाही. पण आता...!" अजित पवारांनी बंड केल्यावर खुपते तिथे गुप्ते निमित्ताने सुप्रिया सुळे पहिल्यांदाच व्यक्त झालेल्या दिसल्या.

दरम्यान आज माध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुप्रिया सुळे दोघांचा फोटो पाहिल्यानंतर भावनिक झाल्याचे दिसल्या त्यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवारांनी बोलणं टाळलं आहे. तुमच्याबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे भावनिक झाल्या असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता त्यावर अजित पवार यांनी बोलणं टाळलं आहे.

दरम्यान ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे कोणकोणत्या विषयांवर भाष्य करणार, तसेच अवधूत गुप्ते त्यांना कोणते प्रश्न विचारणार हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT