Supriya Sule vs Shambhuraj Desai esakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule : शंभूराज देसाईंच्या 'त्या' वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंना झालं दुःख!

'एवरी थिंग इज ओके! तुम्हाला हे सगळं ओके वाटत असेल, पण आम्ही यासाठी राजकारणात आलो नाही.'

सकाळ डिजिटल टीम

'एवरी थिंग इज ओके! तुम्हाला हे सगळं ओके वाटत असेल, पण आम्ही यासाठी राजकारणात आलो नाही.'

Supriya Sule News : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुण्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं ते चांगलेच अडचणी सापडले आहेत. त्यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, एखाद्या मुद्द्यावर मत मांडणं यात काही चुकीचं नाही. छगन भुजबळ यांनी मांडलेला विचार आहे. याबाबत भेटल्यावरती नक्कीच मार्गदर्शन घेईल. कोणीही मत मांडलं म्हणजे तो शत्रू झाला असं होत नाही, असं सुळेंनी नमूद केलंय.

दरम्यान, सुळेंनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील वक्तव्याचा देखील चांगलाच समाचार घेतलाय. त्या म्हणाल्या, देसाईंचं वक्तव्य टिव्हीवर ऐकलं. तुम्हाला पण खोके हवे आहेत का? असं त्यांनी आम्हाला म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर आम्हाला खूप दुःख होतंय, असंही सुळेंनी नमूद केलं. एवरी थिंग इज ओके! तुम्हाला हे सगळं ओके वाटत असेल, पण आम्ही यासाठी राजकारणात आलो नाही. आम्ही राजकारणात आलो ते सगळ्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, असा टोला सुप्रिया सुळेंनी शंभूराज देसाईंना लगावला.

शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडली आहे. त्यामुळंच शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित झालाय. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लढाई सुरू आहे. ही लढाई दुर्दैवी असल्याचं मत खासदार सुळेंनी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव चालतं, सगळं काही चालतं. मग, बाळासाहेबांसाठी सर्वस्व असलेला मुलगा आणि नातू त्यांना का चालत नाही? असा सवालही त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT