Supriya Sule News 
महाराष्ट्र बातम्या

NCPला मुख्यमंत्रीपदाची आशा? मुंडेंच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भाला खूप गांभीर्याने घेत आहे ही आनंदाची बाब आहे

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भाला खूप गांभीर्याने घेत आहे ही आनंदाची बाब आहे

मागील काही दिवसांपूर्वी राज्यांत मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी आगमी काळात राज्याचे मुख्यमंत्रिपद कोणाकडे असेल यावर भाष्य केले. यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. दरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देशांत अनेक पक्ष आहेत, प्रत्येक पक्षाला, नेतृत्वाला, कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा असणे गैर नाही आणि नवीनही नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. (ncp political News)

खासदार सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भाला खूप गांभीर्याने घेत आहे हे आनंदाची बाब आहे. मात्र राज्यसभेसाठी घोडेबाजार होत आहे, हे दुर्दैवी आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटले आहेत. आमच्या नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. मात्र दुर्दैव आहे की महाराष्ट्रात अनेक वर्षानंतर अशी गोष्ट होत आहे. ही कोणत्याही सुसंस्कृत राज्यासाठी चांगली बाब नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.(Supriya Sule News)

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचे मतदानासंदर्भात त्या म्हणाल्या की, आमचे दोन नेते काहीही न करता तुरुंगात आहे. आमच्यावर आणि आमच्या दोन्ही नेत्यांवर अन्याय झाला आहे. तरीही न्यायालयावर विश्वास आहे. आज ना उद्या न्याय मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना मतदानाची संधी मिळावी यासाठी छगन भुजबळ स्वतः प्रयत्न करत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काश्मीरी पंडितांच्या हत्येसंदर्भात त्या म्हणाल्या की, दिल्लीतील केंद्र सरकार वास्तवापासून दूर असून चित्रपटात व्यस्त आहे. काश्मीर वर चर्चा झाली त्यावेळी आम्ही बोललो होतो. केंद्रीय गृहमंत्री म्हणतात यासंदर्भात तीन तास मिटिंग झाली आहे. मग पुढे कारवाईचं काय झालं? काश्मीर मधील पाच दिवसात सात लोकांची हत्या झाली त्यांच्या बद्दल काय? त्यासाठी कोण आहे जबाबदार आहे? असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.

सचिन वाझे प्रकरणावर खासदार सुळे म्हणाल्या, ज्या माणसावरच आरोप आहे, तोच आता माफीचा साक्षीदार होत आहे. 109 वेळा अनिल देशमुख यांच्या घरी छापा टाकण्यात आला आहे. हा जगतिक विक्रम असावा. नेमका त्यांचा गुन्हा काय आहे. नवाब मलिकांवरही नागपूरच्या नेत्याने तीनशे कोटींचा आरोप केला. मग 55 लाखांचा केला आणि आता पाच लाखाचा आकडा समोर आलाय नेमकं खरं काय हे कळायला मार्ग नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीच्या कार्यक्रमावर पोलिसांचा ताबा; माजी महापौरांसह महापालिकेचे अधिकाऱ्यांना अडवले

Ganesh Visarjan 2025 : बाप्पाला काढ ना पप्पा, तो पाण्यात बुडतोय; गणरायाला निरोप देताना कोल्हापुरातील चिमुकला भावूक; पाहा VIDEO

Latest Maharashtra News Updates : विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात विदर्भातील ओबीसी संघटनांची बैठक सुरु

Man Kills Close Friend : जिवलग मित्राचा खून केला अन् रक्ताने माखलेला शर्ट फेकला ओढ्यात, पोलिसांना एक धागा सापडला अन्

SCROLL FOR NEXT