Political esakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री ठाकरेंचं कॉंग्रेस नेत्याकडून तोंंड भरुन कौतुक, म्हणाले..

तिन्ही पक्षांना एकत्र घेऊन चालणे खूप कठीण काम, आजारी असतानाही ते सातत्य टिकवून

सकाळ डिजिटल टीम

तिन्ही पक्षांना एकत्र घेऊन चालणे खूप कठीण काम, आजारी असतानाही ते सातत्य टिकवून

महाराष्ट्रात जे सरकार स्थापन झाले आहे त्याबद्दल उद्धव ठाकरेंचे आभार मानायला हवेत. तिन्ही पक्षांना एकत्र घेऊन चालणं कठीण काम आहे. आजारी असतानाही ते सातत्य टिकवून आहेत, असे गौरवोद्गार काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी काढले आहेत. महाराष्ट्र कशा पद्धतीने जातीय आणि धर्मवादी शक्तीपासून वाचवला पाहिजे याचं सुरेख उदाहरण आहे, या शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं (CM Uddhav Thackeray) कौतुक केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यांनी मान्य केला आणि त्याचा अवलंब करत आहेत. आजारी असतानाही सातत्य टिकवून आहेत. तिन्ही पक्षांना एकत्र घेऊन चालणे खूप कठीण काम आहे. तिन्ही पक्ष चांगले काम करत आहेत. राज्य सरकारमधील मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवर बोलताना त्यांनी सीबीआय, ईडी (ED) यांचा वापर कधी असा झाला होता का? याबद्दल जास्त न बोललेले बरे, असे म्हणत त्यांनी जास्त बोलण्यास नकार दिला.

आम्ही जे बोलत असतो ते काँग्रेस अध्यक्षांशी बोलत असतो. बाकीचे सगळे खासदार, कार्यकर्ते यांना बोलून जास्त काही होत नाही. राहुल गांधी, प्रियंका गांधी आमचे नेते आहेत, त्यांच्याशी बोलणं होत असतं. आम्ही सर्वजण गांधी कुटुंबाला स्वीकारणारे आहोत. त्या घराण्यातून आलेल्या लोकांचं नेतृत्व आम्हाला मान्यच आहे. ते कोणी करावं हे कमिटी ठरवेल. गांधी घराण्यात सध्या सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका आहेत. या तिघांमुळे घराणं टिकून आहे. त्या घराण्यातून जो विचार येतोय तो काँग्रेसचा आहे. एखाद्या वेळी चूक झाली असेल पण सुधारणा होईल. असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT