sushilkumar shinde
sushilkumar shinde sakal
महाराष्ट्र

सुशीलकुमार शिंदे राष्ट्रपतीच्या शर्यतीत! काँग्रेसची दिल्लीत बैठक

तात्या लांडगे

सोलापूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत २४ जुलैला संपणार आहे. तत्पूर्वी, २९ जूनपर्यंत नवीन राष्ट्रपती पदासाठी अर्ज करावा लागणार आहे. १८ जुलैला मतदान होणार असून २१ जुलैला निकाल लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर सर्वसमावेशक चेहरा म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांना दिल्लीतून निरोप आल्यानंतर शिंदे हे तातडीने दिल्लीला पोहचले असून आता त्यासंदर्भात बैठक सुरु आहे.

राष्ट्रपदीपदासाठी निवडणूक होत असून भाजपकडून काहीजण इच्छुक आहेत, पण त्यांची नावे अजून जाहीर झालेली नाहीत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, व्यंकया नायडू, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांकडून सर्वसमावेश असा उमेदवार शोधला जात आहे. त्यासाठी २९ जूनपर्यंत अर्ज करावे लागणार असल्याने अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना दिल्लीचे निमंत्रण आले. रविवारचे सर्व कार्यक्रम रद्द करून ते राजधानीत दाखल झाले आहेत. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आजारी असल्याने रुग्णालयात आहेत. सोमवारी राहुल गांधी यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. राष्ट्रपतीची निवडणूकही जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात अनेकांनी साथ सोडली, पण सुशिलकुमार शिंदे व त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे या पक्षासाठी महेनत घेत आहेत. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे हे यापूर्वीच भाजपमध्ये दाखल होऊन केंद्रीय मंत्री झाले आहेत. माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनीही अपक्ष राहून वेगळी वाट धरली असून ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेकजण राजकारणापासून अलिप्त असल्याची स्थिती आहे. सत्ता नसल्याने सैरभैर झालेल्या काँग्रेसजनांच्या मागे आता ‘ईडी’ लागली आहे. अशा परिस्थितीत सुशिलकुमार शिंदे यांचा पक्षाला आधार वाटत आहे. दरम्यान, २००२ मध्ये भैरोसिंग शेखावत यांच्याविरूद्ध उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी सुशीलकुमार शिंदे यांना मिळाली होती. त्यावेळी मतांच्या अंदाजात शेखावत विजयी होणार हे निश्चित होते. तरीही शिंदे यांनी पक्षाचा आदेश मानून उमेदवारी अर्ज भरला होता. आता राष्ट्रपतीपदासाठी भाजप देईल, तोच उमेदवार विजयी होईल, अशी स्थिती आहे. तरीदेखील, या निवडणुकीत शिंदे हेच राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २०) राहुल गांधी यांना ईडीच्या कार्यालयात पुन्हा एकदा चौकशीला जावे लागणार आहे. यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होईल, असे बोलले जात आहे.

  • राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील ठळक मुद्दे
    - २९ जूनपर्यंत नामांकन अर्ज भरणे, १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी निकाल
    - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एकूण १०,८०,१३१ मतांची गोळाबेरीज असेल. ज्या उमेदवाराला ५,४०,०६५ पेक्षा जास्त मतमूल्य मिळेल, तो उमेदवार विजयी होईल.
    - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी ७६७ खासदार (५४० लोकसभा, २२७ राज्यसभा) आणि एकूण ४,०३३ आमदार मतदान करतील. प्रत्येकी - एका खासदाराच्या मताचं मूल्य ७०० इतकं आहे. म्हणजेच एकूण मतांचं मूल्य ३,१३,६०० आहे.
    - राज्याची लोकसंख्या आणि एकूण आमदारांच्या संख्येवरून आमदारांच्या मतांचं मूल्य ठरवलं जातं.
    - यूपीमध्ये २०८ तर सिक्कीममध्ये फक्त ७ आमदार आहेत.
    - एकूण ४०३३ आमदारांचं मतमूल्य ५,४३,२३१ इतकं आहे. अशा प्रकारे निवडणुकीसाठी एकूण मतमूल्य १०,८०,१३१ इतकं असते.
    - या निवडणुकीत जिंकण्यासाठी ५० टक्के म्हणजेच ५,४०,०६५ पेक्षा जास्त मत आवश्यक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुख खानचे दमदार अर्धशतक, गुजरातने पार केला 120 धावांचा टप्पा

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT