Sushma Andhare slam devendra fadnavis over sheetal mhatre viral video case eknath shinde
Sushma Andhare slam devendra fadnavis over sheetal mhatre viral video case eknath shinde  sakal
महाराष्ट्र

Sushma Andhare : ...फडणवीस गृहमंत्री म्हणून कुचकामी ठरतायेत; शितल म्हात्रे प्रकरणवरून सुषमा अंधारेंचा घणाघात

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात सध्या उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची धरपकड सध्या सुरू आहे. या प्रकरणी आतापर्यंत ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेले कल्याण येथील विनायक डायरे यांच्या कुटुंबियांची सुषमा अंधारे यांनी भेट घेतली.

यावेळी सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी शिंदे-भाजप सरकारवर सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे. सोबतच त्यांनी सरकारकडे तीन मागण्या देखील यावेळी केल्या आहेत. त्यांनी मागणी केली की, या व्हिडीओचे मूळ युआरएल आहे ते आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या अकाउंटवरून फेसबुक लाईव्ह झालं आणि नंतर ते डिलीट झालं. ते रिकव्हर केलं पाहिजे.

त्यानंतर अंधारे यांनी मागणी केली की, जर व्हिडिओ मॉर्फ आहे तर ओरिजनल व्हिडिओ दाखवलाच गेला पाहिजे. तसेच सरकारकडून घोषणा झालेल्या एसआयटी बद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, एसआयटी नेमायची असेल, तर ती उच्च न्यायालयाच्या आखत्यारीत नेमली पाहिजे.

अंधारे यांनी या प्रकरणात पहिल्यांदा व्हिडियो अपलोड करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्याचवेळी या कुटुंबाला देखील संरक्षण मिळण्याची गरज असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही सत्तेचा गैरवापर करू शकत नाहीत.

फडणवीस कुचकामी ठरत आहेत..

दुचाकीस्वारांनी पाठलाग केल्या प्रकरणी शितल म्हात्रे यांनी दादर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यावर विचारले असता, याचा अर्थ देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून कुचकामी ठरत आहेत असा होतो असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. इतक्या मोठ्या चर्चेत असणाऱ्या व्यक्तीचा जर पाठलाग होत असेल तर गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरलं आहे. तात्काळ मुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्र्यांना आदेश देऊन त्यांच्याकडून खातं काढून घेतलं पाहिजे. हे सगळे चुकीचे होत आहे, असा टोलाही अंधारे यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT