महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची झोप उडवणाऱ्या कोण आहेत 'या' तीन युवती 

सागर आव्हाड

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीन युवती कार्यकर्त्यानी सध्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झोप उडवली आंहे. या तीन युवतींविषयी जाणून घेऊया.

HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण

अकोले येथे मुख्यमंत्र्यांच्या तापफ्यावर शाही फेकून आंदोलन करत मुख्यमंत्री गो बॅकची घोषणा देणारी शर्मिला येवले ही आक्रमक झाली होती. तर, मुख्यमंत्री यांनी गड किल्ल्याबाबत जो निर्णय घेतला, त्या निर्णयाला विरोध करत सिंहगडावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचा कडेलोट करणारी पूजा झोळे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती आहे. तर, शेतकरी संघटनेची युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे हिने ही या पूर्वी मुख्यमंत्री जनदेश यात्रेत मराठवाड्यात गोंधळ घातला होता. या तीन रणरागिणी शेतकरी संघटनेच्या असल्या तरी सरकार विरोधात आक्रमक आहेत. शेतकरी संघटना आक्रमक नसली तरी या तीन युवतींनी मुख्यमंत्र्यांची झोप उडवली आहे.

पूजा झोळे ही मूळची करमाळा, जि. सोलापूरची एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून आता वकिलीचे शिक्षण घेत आहे. गेली आठ वर्षे झाले योग शिक्षिका, विद्यार्थी संघटना आंदोलने, तसेच मराठा क्रांती मोर्चामध्ये कार्य, तसेच सामाजिक कार्य करीत असून ज्या प्रकारे सरकारे महाराष्ट्राची अस्मिता असणारे गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधात मी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचा कडेलोट केला. तर, पूजा मोरे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती अध्यक्षा असून, आता त्या गेवराई पंचायती समिती सदस्या आहेत.

शर्मिला येवले ही फर्ग्युसन महाविद्यालयात एमए मराठी करत आहे. शर्मिला ही मुळची इंदुरी ता. अकोले जि. अहमदनगर येथील रहिवाशी आहे. सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतले व त्याचे अवलंबन माझ्या तालुक्यात झाले नाही आणि त्या कारणाने जनतेचे अतोनात हाल होत आहेत. ही सत्य परिस्थिती शासन दरबारी मांडण्यासाठी मी आक्रमक पवित्रा घेतलेली आहे, असे शर्मिलाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT