Ambadas Danve Maharashtra Assembly Budget Session esakal
महाराष्ट्र बातम्या

Budget Session : 'त्या' दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करा; सभागृहात अंबादास दानवेंनी वेधलं लक्ष

राज्यविधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

सरकारी अधिकाऱ्यांना दुर्घटना झाल्यावर प्रवेश नाकारला जातो, अशाप्रकारे कंपन्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे.

Maharashtra Assembly Budget Session : राज्यविधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतरचं हे त्यांचं पहिलंच अधिवेशन आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून सभागृहात गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्षात आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. आता जिंदाल पॉलिफिल्म प्रा. लि. कंपनीतील (Jindal Polyfilm Company) दुर्घटनेप्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आज सभागृहाचं लक्ष वेधलं.

या कंपनीतील दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी तेथील अग्निशमन यंत्रणा ही या घटनेच्या आधीपासूनच बंद होती. प्लँटमधून थर्मिक फ्लूईड ऑईलची गळती होऊन अनेक कामगार जखमी झाले, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सभागृहात दिली.

अशा घटना टाळण्यासाठी व घटना घडल्यावर कारवाई व्हावी, यासाठी जो विभाग काम करतो, तो म्हणजे औद्योगिक सुरक्षा व कामगार विभागांतर्गत येणारा डिश विभाग. मात्र, हा विभागच अकार्यक्षम असल्याचा मुद्दा दानवेंनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. या घटनेला कंपनी जबाबदार असतानाही पोलिसांना (Police) कारवाई करता येत नाही, असंही दानवे म्हणाले.

सरकारी अधिकाऱ्यांना दुर्घटना झाल्यावर प्रवेश नाकारला जातो, अशाप्रकारे कंपन्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे. या प्रकरणात 3 जणांचा मृत्यू, तर 20 जण जखमी झाले आहेत. त्यामुळं या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या कंपनीवर सरकार काय कारवाई करणार? असा सवालही दानवेंनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT