Teachers day black ribbon movement by junior college teachers maharashtra news Sakal
महाराष्ट्र बातम्या

Jr College Teacher Protest : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे शिक्षकदिनी काळ्या फीत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

Jr College Teacher Protest : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. ५) शिक्षकदिनी काळी फीत आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी दिला. आज सहाय्यक शिक्षण संचालक एल. डी. सोनवणे यांना संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (Teachers day black ribbon movement by junior college teachers maharashtra news)

उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार आंदोलनावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उन्हाळी अधिवेशन संपल्यावर चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र पावसाळी अधिवेशन संपून महिना झाला, तरीही चर्चा केलेली नाही.

त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये फसवणूक केल्याची भावना तयार झाली आहे, असे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अर्धवेळ, अंशतः अनुदानित तत्त्वावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवानिवृत्तांना या योजनेचा लाभ द्यावा, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे १०-२०-३० वर्षांची आश्‍वासित प्रगती योजना लागू करावी आणि निवड श्रेणीसाठीची २० टक्क्यांची अट रद्द करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.

संघटनेच्या इतर मागण्या

संघटनेतर्फे आंदोलनानिमित्ताने १३ मागण्या केल्या आहेत. त्यातील काही मागण्या अशा : वाढीव पदांना रुजू दिवसापासून मंजुरी देऊन आय. टी. विषय अनुदानित करावा, अघोषित उच्च माध्यमिकला अनुदानासह घोषित करून अंशतः अनुदानाच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलित अनुदान सूत्र लागू करावे, अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, विनाअनुदानितमधून अनुदानितमध्ये बदलीला १ डिसेंबरपासून लागू केलेली स्थगिती रद्द करावी, शिक्षकांची सर्व रिक्तपदे भरण्यात यावीत. संघटनेच्या निवेदनावर प्रा. शिंदे यांच्यासह सचिव प्रा. संतोष फाजगे, समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर यांची स्वाक्षरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT