Uddhav Thackeray and Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: ठाकरेंचा CM शिंदेंना मोठा धक्का! रत्नागिरीतील सभेपूर्वीच बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक ठाकरे गटात

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर इतर पक्षातून शिंदे गटाकडे आणि भाजपकडे जोरदार इनकमिंग सुरू आहे. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. ठाकरे गटातील आणखी काही आमदार शिंदे गटात जाणार असल्याचा दावा शिंदे गटातील नेते करताना दिसत आहेत. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात वेगळं चित्र दिसून येत आहे.

दापोलीमध्ये ठाकरे गटाने शिंदेच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक आणि दापोली नगपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय.

दापोली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर हे आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक आहेत. मात्र कुसाळकर यांनी आता ठाकरे गटात प्रवेशाने हा शिंदे गटासोबतच योगेश कदम यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे. कुसाळकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वी देखील ठाकरे गटाने जिल्ह्यात शिंदे गटाला धक्के दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये ठाकरे गटाची मोठी सभा झाली. या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने आज खेड येथील गोळीबार मैदानात सभेचं आयोजन केलं आहे. या सभेचा टिझर देखील जारी करण्यात आला आहे. मात्र सभेपूर्वीच एकनाथ शिंदे यांना रत्नागिरी जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या सभेवेळी माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना जिल्ह्यात आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाकडून रणनिती आखण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर संजय कदम यांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT