Sushma Andhare sakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare : 'एक मिमिक्री आर्टिस्ट...'; सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना सभेपूर्वीच डिवचलं

संतोष कानडे

महाडः उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा होत आहे. आज त्यांनी बारसुला भेट दिल्यानंतर ते पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारसह भाजप नेते आणि राज ठाकरेवर टीकास्र सोडलं.

यावेळी बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपने बारसु प्रकल्प करण्याचा घाट घातला आहे. लोक कुणाच्या सोबत आहेत हे आज बारसुमध्ये सिद्ध झालं. पुढे बोलतांना त्यांनी भरत गोगावले यांच्यावर आसूड ओढला. शेठ आणि नेता यातला फरक त्यांनी स्पष्ट केलं. भरतशेठला त्यांची जागा दाखवली पाहिजे, असं अंधारे म्हणाल्या.

राज ठाकरेंबद्दल बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की, आज रत्नागितीमध्ये मिमिक्री आर्टिस्टची सभा आहे, असं बोलून त्यांनी सभास्थळी हशा पिकवला. आमचं हिंदुत्व हे हिंदुंना रोजी-रोटी देणारं हिंदुत्व आहे. त्यामुळे कुणीही आम्हांला हिंदुत्व सांगू नये.

राणेंबद्दल बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की, राणे साहेबांच्या दोन्ही पोरांना सीरियस घ्यायची मला गरज वाटत नाही. मुळात राणे साहेबांनाच सीरियस घ्यायची गरज नाही. त्यांना त्यांच्या मालकाने काम दिलेलं आहे, ते ते करत असल्याचा घणाघात अंधारेंनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT