Sushma Andhare Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare: "राखी सावंतची तुलना फक्त अमृता फडणवीसांशीच होऊ शकते"

मोहित कंबोज यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारेंचा अमृता फडणवीसांवर निशाणा

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाकरे गटाच्या फायरब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अभिनेत्री राखी सावंतची तुलना अमृता फडणवीस यांच्याशी केली आहे. दोघीही गायन, मॉडलिंग क्षेत्राशी निगडित आहेत आणि दोघींचीही प्लास्टिक सर्जरी झालेली आहे, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी राखी सावंत आणि अमृता फडणवीस यांची तुलना केली आहे. राखी सावंत यांची तुलना अमृता फडणवीस यांच्याशी होऊ शकते माझ्याशी नाही, असं म्हणत मोहित कंबोज यांनी केलेल्या तुलनेचा अंधारेंनी समाचार घेतला आहे.

सुषमा अंधारे बोलताना म्हणाल्या की, "सध्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच भाजपचे अनेकजण माझ्यावर कुठल्याही स्तराला जाऊन हल्ला करत आहेत. माझ्या स्त्रीपणावर घाला घातला जात आहे, पण मी चळवळीचं शास्त्र शिकून आली आहे. मी हार मानणार नाही. मी बाईपणाचं कोणतही विक्टिम कार्ड खेळणार नाही. मी लढेन आणि होय मी जिंकेन आणि मीच जिंकेन, खात्रीनं जिंकेन. मला डॅमेज करण्याचा जो प्रयत्न हे सर्वजण करतात, तो प्रयत्न मी सक्सेस होऊ देणार नाही" असं त्या म्हणाल्या आहेत.

मोहित कंबोज यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "माध्यमांचे प्रतिनिधी मला मोहित कंबोज यांच्या टीकेवर प्रतिक्रिया का देत नाही? असा प्रश्न सातत्याने विचारत होते. पण कंबोजचं इन्टेनशन हीज इंटेन्शन वॉज नॉट गुड... त्याचं इंटेन्शन जर चांगलं असतं तर त्यानं राखी सावंतची तुलना आणखी कोणाशीतरी केली असती".

"कारण बिचारी राखी सावंत जी आहे तिचं क्षेत्र गायन, मॉडलिंग, डान्सिंग... काय तिचा मेकओव्हर, काय तिचा तो लूक...फोटोशूट अन् काय-काय भानगडी असतात, आम्ही आमच्या आयुष्यात फोटोशूट कधी केलं? दहावी आणि बारावीच्या हॉलतिकिटासाठी फोटो काढताना. यापलिकडे आम्हाला फोटोचं काही माहीतच नाही. जर त्या बिचाऱ्या माऊलीची तुलना होऊ शकत असेल, तर तिच्या क्षेत्रानुसार तुलना ही आमच्या अमृता वहिनींसोबत होईल."

"आमच्या राखीताईंची सर्जरी झाली चेहऱ्याची तशी आमच्या अमृता वहिनींचीही झाली आहे. आमच्या राखीताई सिंगर आहेत. आमच्या अमृता वहिनीही सिंगर आहेत. आमची राखीताई मॉडेल आहे. आमच्या अमृता वहिनीही मॉडेल आहेतअसं म्हणत सुषमा अंधारे यांनी मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर देताना थेट अमृता फडणवीसांवर निशाणा साधला आहे. जर त्यांचं इंटेशन चांगलं नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT