Nitin Deshmukh Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Deshmukh : ''... म्हणून मी कपडे घेऊन चौकशीला जात आहे''

बॅग भरुन आमदार नितीन देशमुख निघाले ACB कार्यालयाकडे; फोटो व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या चौकशीचा सपाटा लागला आहे. त्यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अनिल देशमुख, अनिल परब, हसन मुश्रीफ यांच्यासह बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे आज अमरावतीच्या एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. पण यावेळी देशमुख चौकशीला जाण्याआधी मोठं शक्तीप्रदर्शन करुन रवाना झाले आहेत.

अमरावतीच्या एसीबीच्या कार्यालयात आज चौकशीसाठी शिवसेना आमदार नितीन देशमुख हजर होणार आहे. आपल्याला अटक होईल म्हणून या पार्श्वभूमीवर नितीन देशमुख पूर्ण तयारी करून रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांचं औक्षण केलं असून आपल्याला अटक होईल यामुळे त्यांनी काही कपड़ेही सोबत घेतले आहेत. यावेळी बॅगमध्ये कपडे भरतानाचा त्यांचा फोटो व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

नितीन देशमुख अकोल्यातील त्यांच्या कार्यालयातून अमरावतीकडे निघाले आहेत. त्यांनी त्यांच्या सोबत कपडे आणि काही वस्तु घेतल्या आहेत. अकोल्यातून जवळपास 700 कार्यकर्ते देशमुखांसोबत अमरावतीकडे रवाना झाले आहे.

दरम्यान, नितीन देशमुख बोलताना म्हणाले की, आज अशी मानसिकता निर्माण केली की, अमरावतीचे एसीबी कार्यालयात हजर झाल्यानंतर मला अटक करतील, त्यानंतर आत टाकतील त्या हिशोबाने तयारीलाच लागलो, म्हणून आज घरून कपडे घेऊन सोबत चाललोय. कारण की, हुकूमशाहीच्या पद्धतीने सरकार चालू आहे, इंग्रजापेक्षा हे खराब लोक आहेत, असा आरोप नितीन देशमुख यांनी बोलताना केला आहे

मला सुरतला नेण्यात आले, तेव्हा माझ्याकडे कपडे नव्हते. मी गेलो होतो त्याच कपड्यांवर सुरतहून माघारी परतलो. आजदेखील मला अटक होण्याची शक्यता आहे. त्याच तयारीने मी निघालो आहे. सरकार हुकूमशाही पद्धतीने चालवले जात आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही कारवाईसाठी तयार आहोत, असे नितीन देशमुख यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं आणखी स्वस्त! चांदीच्या तेजीला ब्रेक; जाणून घ्या आजचा ताजा भाव

Viral Video : गणितात दिले १८ गुण, विद्यार्थ्याची शिक्षिकेला भर वर्गात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Kolhapur ZP : शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा ‘नेम’ चुकला; काँग्रेसला उभारीने कार्यकर्त्यांना उत्साह

Latest Marathi News Live Update : संभाजीनगर : महापौर, उपमहापौर निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना तटस्थ राहणार

Elon Musk: एलॉन मस्क यांची मोठी घोषणा; पुढील १० वर्षांत चंद्रावर साकारणार 'स्वयंपूर्ण शहर'!

SCROLL FOR NEXT