court order
court order esakal
महाराष्ट्र

Solapur Crime News: राज्यातील पहिलीच शिक्षा! गुप्तांग कापून खुनाचा प्रयत्न; तिघांना ३० वर्षाची सक्तमजुरी व ३० लाखांच्या भरपाईचे आदेश

तात्या लांडगे

Solapur News : जेवायला जाण्याचा बहाणा करून जेवणानंतर निर्जनस्थळी नेऊन विश्वासघाताने तिघांनी फिर्यादीचे गुप्तांग कापले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांनी तिन्ही आरोपींना ३० वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच जखमी फिर्यादीला ३० लाखांची भरपाई देण्याचेही आदेश दिले

फिर्यादी हा घरी असताना खदीरसाब उर्फ नंदा चांदसाहेब पटेल व अ.हमीद ऊर्फ अमीर नजीर मुल्ला (दोघेही रा. तडवळगा, ता. इंडी) हे त्याच्याकडे आले. त्यांनी जेवायला जावू म्हणून फिर्यादीला बाहेर नेले.

धाब्यावर जेवायला बसल्यावर हुसेनी नबीलाल जेऊरे ऊर्फ तोडुंगे (रा. करजगी, ता. अक्कलकोट) ता त्याठिकाणी आला. सर्वांचे जेवण झाल्यावर आरोपी अ. हमीद याने त्याच्या मित्राची रिक्षा कडबगावजवळ बंद पडल्याचे सांगून त्यांनी फिर्यादीला निर्जनस्थळी नेले.

त्याठिकाणी आरोपी अ. हमीदने त्याला शिवीगाळ केली व त्याच्या बियरची डोक्यात बाटली घातली. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला होता.

सरकारी वकिलांचा जोरदार युक्तीवाद

फिर्यादी जीवनात कधीच सामान्य माणसाप्रमाणे उपभोगू शकत नाही. त्यामुळे जखमीस जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी म्हणत सरकारी वकिल माधुरी देशपांडे व नागनाथ गुंडे यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले.

तो युक्तीवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. औटी यांनी आरोपींना शिक्षा ठोठावली. मूळ फिर्यादीतर्फे ॲड. हुसेन बागवान यांनी तर आरोपींतर्फे ॲड. रियाज शेख यांनी काम पाहिले. कोर्टपैरवी म्हणून दिनेश कोळी यांनी मदत केली.

न्यायाधीशांकडून १५ दिवसांत निकाल

आरोपींतर्फे या गुन्ह्याचा निर्णय लवकर व्हावा म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे विनंती अर्ज करण्यात आला होता.

१३ फेब्रुवारी रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. औटी यांनी या गुन्ह्याचा तपासणी सुरु केली आणि २८ फेब्रुवारीला त्याचा निकालही दिला. तिन्ही आरोपींचा फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा उद्देश होता.

अतिशय निर्घुणपणे हे कृत्य करून आरोपींनी फिर्यादीच्या जीवनात अपरिमित असे नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर आरोपींना शिक्षा ठोठावली. खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात एवढी मोठी शिक्षा देण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असावी, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT