corona 
महाराष्ट्र बातम्या

कोरोना रुग्णवाढीत राज्यात टॉप 10 मध्ये सोलापूर ग्रामीण

तात्या लांडगे

राज्यातील 36 पैकी 11 जिल्ह्यांमधील निर्बंध 'जैसे थेच' ठेवण्यात आले आहेत. सोलापूर ग्रामीण त्या यादीत टॉप टेनमध्ये असून, शहरातील कोरोना आटोक्‍यात आल्यानंतरही ग्रामीणमधील रुग्णवाढीमुळे निर्बंध शहर-ग्रामीणमध्ये कायम ठेवण्यात आले आहेत.

सोलापूर: राज्यात 1 ते 30 जुलैदरम्यान दोन लाख 26 हजार 157 रुग्ण वाढले आहेत. चिंतेची बाब म्हणजे 11 जिल्ह्यांमध्येच एक लाख 90 हजार 242 रुग्ण आढळले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 36 पैकी 11 जिल्ह्यांमधील निर्बंध 'जैसे थेच' ठेवण्यात आले आहेत. सोलापूर ग्रामीण त्या यादीत टॉप टेनमध्ये असून, शहरातील कोरोना आटोक्‍यात आल्यानंतरही ग्रामीणमधील रुग्णवाढीमुळे निर्बंध शहर-ग्रामीणमध्ये कायम ठेवण्यात आले आहेत.

Corona

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून हिंगोली, वाशिम, जालना, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे सावरू लागले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे, नंदूरबार जिल्ह्यातील केवळ नऊ रुग्णांवर उपचार सुरू असून उर्वरित रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे लागू केलेले निर्बंध आता राज्य सरकारने उठविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (2 ऑगस्ट) दुकानांची वेळ रात्री आठपर्यंत वाढविली जाणार असून, आठवडाभर दुकाने सुरू ठेवली जाणार आहेत. मात्र, निर्बंध कायम ठेवलेल्या 11 जिल्ह्यांपैकी त्यातील बहुतेक शहरांमधील कोरोनाचा संसर्ग कमी होऊनही त्याठिकाणचे निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत.

corona

सोलापूर शहरातील कोरोना आटोक्‍यात आला, परंतु ग्रामीणमधील रुग्णवाढ कायम असल्याने शहर-ग्रामीणसाठी एकच आदेश काढण्यात आला आहे. तत्पूर्वी, ग्रामीणप्रमाणे शहरात निर्बंध ठेवू नयेत, असा प्रस्ताव महापालिका आयुक्‍तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठविला होता. पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने निर्बंध हटविण्यात यश मिळाले. मात्र, आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने महापालिका आयुक्‍त प्रस्ताव पाठविणार का, याची उत्सुकता आहे.

Corona Update

जुलैमधील कोरोनाची स्थिती

------------------------------------------

जिल्हा  (1 ते 30 जुलै) ऍक्‍टिव्ह रुग्ण

-----------------------------------------

कोल्हापूर    35,103           6,581

पुणे             32,123         16,001

सांगली        28,261           7,656

सातारा        24,017           7,936

नगर           16,977           5,445

रायगड       14,316            3,057

सोलापूर      12,448            4,471

रत्नागिरी       8,869             2,132

पालघर        7,817             1,117

सिंधुदूर्ग       6,226              1,923

बीड            4,085              1,705

-------------------------------------------------

एकूण     1,90,242           58,024

corona update

निर्बंध उठविण्यासाठी हवी एकी

शहराची लोकसंख्या 12 लाखांहून अधिक असतानाही निर्बंध लागू करताना 2011 च्या जनगणनेचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीणमध्ये निकष व निर्बंध शहरासाठीही 'जैसे थेच' ठेवले आहेत. शहरातील व्यापारी, लघू उद्योजक, व्यावसायिकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यांनी लोकप्रतिनिधींना निवेदनेही दिली आहेत. त्यावर आता महापालिकेतील सत्ताधारी, विरोधक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा रेटा लावण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT