'ओमीक्रोन'मुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय बदलणार? esakal
महाराष्ट्र बातम्या

'ओमीक्रोन'मुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय बदलणार?

'ओमीक्रोन'मुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय बदलणार?

तात्या लांडगे

दक्षिण आफ्रिकेत 'ओमीक्रोन' हा कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

सोलापूर : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) 'ओमीक्रोन' (Omicron) हा कोरोनाचा (Covid-19) नवीन व्हेरिएंट आला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्य सरकारने (Maharashtra State Government) नवीन नियमावली जाहीर केली आहे. या पार्श्‍वभूमीवर 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांचा (Schools) निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. तरीही, आणखी तसा काहीच निर्णय न झाल्याने शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जवळपास अडीच हजार शाळा आहेत. त्या शाळांमध्ये दोन लाख विद्यार्थी प्रवेशित आहेत. तर महापालिकेच्या पहिली ते सातवीच्या 358 शाळांमध्ये जवळपास एक लाखांपर्यंत विद्यार्थी आहेत. शासनाच्या आदेशानंतर शहरातील या शाळा उघडणार आहेत. सध्या आठवी ते बारावीच्या 56 शाळा सुरु आहेत. जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या एक हजार 87 शाळा सुरु आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या पूर्वीच्या आदेशानुसार शहरातील आठवी ते बारावीच्या तर ग्रामीणमधील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सध्या सुरु आहेत.

लिखित आदेशाशिवाय शाळा सुरु होणार नाहीत

शहरी व ग्रामीण भागातील पहिली ते चौथी, पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी घेतला. परंतु, त्यासंदर्भातील कोणतेही लिखित आदेश प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. तसेच शाळा सुरु करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनाही मिळालेल्या नाहीत. त्यामुळे शासनाचा लिखित आदेश आल्याशिवाय महापालिकेच्या शहरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु होणार नाहीत, अशी माहिती प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी दिली.

1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याची तयारी केली असून काही शाळांनाही भेटी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना कोरोना होणार नाही, याची तंतोतंत खबरदारी घेतली जात आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करून शाळा सुरु होतील. शाळा सुरु होणे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी गरजेचे आहे.

- दिलीप स्वामी, सीईओ, सोलापूर जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT