sanjay raut slam eknath shinde devendra fadanvis govt ministers over ncp rohit pawar belgaon visit  e sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra-Karnataka Row: "...तर 5 लाखांचं बक्षीस जाहीर करतो"; शहा-शिंदेंच्या बैठकीनंतर राऊतांचं आव्हान

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्हीकडील मुख्यमंत्री गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला गेले होते.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra-Karnataka Row: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट राज्यातील भाजप नेत्यांवर निशाणा साधाला. (then I announce reward of Rs 5 lakh Sanjay Raut challenge after Amit Shah Eknath Shinde meeting)

दिल्लीत पार पडलेल्या या बैठकीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत थांबवण्याचं ठरलं तसेच दोन्ही राज्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी करण्याचं ठरलं. पण यानं समाधान न झालेल्या संजय राऊतांनी थेट राज्यातील भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला.

माध्यामांशी बोलताना राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या, शरद पवारांच्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखील सीमाभागाची लढाई कायम राहिल. कारण हा प्रश्न एक राजकीय किंवा व्यक्तिगत प्रश्न नाही. हा प्रश्न २०-२२ लाख मराठी बांधवांचा आहे. वेळ पडली तर आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत. भाजपच्या राज्यातील एकाही नेत्यानं एकदाही हे ठामपणे सांगितलेलं नाही की, बेळगावसह संपूर्ण सीमाभाग हा महाराष्ट्रातच राहिला पाहिजे. हे कोणी ऐकलं असेल तर मला त्यांनी सांगावं, मी आत्ता माझ्यावतीनं त्यांना पाच लाख रुपये बक्षीस जाहीर करतो"

हे ही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

दोन्ही राज्यात कायदा व सुव्यवस्था टिकावी म्हणून ज्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण करण्यात येणार आहे. ते आयपीएस अधिकारी कोणत्या राज्याचे असणार हे पहावं लागेल. सीमाभागातील कर्नाटकचा पोलीस फोर्स आधी मागे घेतला पाहिजे तसेच तिथं केंद्राच्या पोलिसांनी ताबा घेतला पाहिजे, अशी मागणीही यावेळी राऊत यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT