rajesh tope
rajesh tope Sakal media
महाराष्ट्र

...तर कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉनची असू शकेल: राजेश टोपे

सकाळ डिजिटल टीम

जालना: ओमिक्रॉनचे रुग्ण देशात आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या व्हेरियंटमुळे तिसरी लाट येणार का, अशा चर्चांना उधाण आलेलं असतानाच आज ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण गुजरातमधील जामनगरमध्ये आढळला आहे. याआधी कर्नाटकात (Karnataka) ओमिक्रॉनचे दोन रूग्ण आढळून आले होते. जामनगरमधील संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वे (Zimbabwe) येथून आली असून जामनगर (Jamnagar) येथे हा रूग्ण आढळून आला आहे. याचा महाराष्ट्रातील परिस्थितीवर कसा परिणाम होऊ शकतो याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची विधाने केली आहे.

त्यांनी म्हटलंय की, ज्याप्रमाणे कर्नाटकात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून आणखी काही रुग्ण सापडले. तर या सगळ्यामुळे आणखी संसर्ग वाढण्याची भीती नक्कीच वाटते. त्यामुळे त्याची काळजी आपल्याला घ्यायलाच पाहिजे. काळजी न घेतल्यास देशात कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉनची असू शकेल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. ओमिक्रॉनन धोकादायक नाही पण त्याचा संसर्ग वेगाने होतो, असं त्यांनी म्हटलयं.

मात्र, लगेच निर्बंध लागू करणं हे जाचक होईल, ते त्रासदायक ठरेल म्हणून सध्या निर्बंधांची आवश्यकता नक्कीच नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT