महाराष्ट्र बातम्या

Coronavirus : राज्यातील ३० टक्के कोरोनाचे सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यातील ३० टक्के कोरोनाचे सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्या पाठोपाठ ठाणे (१७ टक्के) आणि मुंबईमध्ये (१३ टक्के) रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. राज्यात बुधवारपर्यंत ५८ हजार ३७६ कोरोनाच्या सक्रिय रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १७ हजार ४४६ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. 

पुण्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात (९ हजार ८४२) आणि मुंबईमध्ये सात हजार ६५० आहेत. देशात सक्रिय रुग्णांचे प्रमाण २.९ टक्के असून, महाराष्ट्रात ते ३.०७ टक्के असल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

दरम्यान, सात हजार ६२० रुग्ण कोरोनामुक्‍त होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख एक हजार ७०० कोरोनामुक्त होऊन होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५१ टक्के एवढे झाले आहे.

दृष्टिक्षेपात राज्यातील स्थिती
आज राज्यात तीन हजार ९१३ नवीन रुग्णांचे निदान झाले. 
राज्यात आज ९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५७ टक्के एवढा आहे. 
आतापर्यंत तपासलेल्या एक कोटी २२ लाख ७८ हजार ४७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख सहा हजार ३७१ (१५.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

दिवसभरात एका मृत्यूची नोंद 
शहरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. पुण्यात एप्रिलमध्ये मृत्यूदर ११.४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला होता. तो आता २.१ टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाला आहे. शहरात बुधवारी एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद महापालिकेत झाली.

दृष्टिक्षेपात कोरोना रुग्ण
अत्यवस्थ -    ३८५
व्हेंटीलेटवरील - २२५
अतिदक्षता विभागातील - १६०
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT