Twin Sisters Wedding Esakal
महाराष्ट्र बातम्या

Twin Sisters Wedding: एकाच मांडवात जुळ्या मुलींशी केलेल्या लग्नाचा मुद्दा थेट संसदेत; नवनीत राणा म्हणाल्या....

एकाच मंडपात दोन महिलांशी केलेल्या बहुचर्चित विवाहाचा मुद्दा आता संसदेपर्यंत

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने एकाच मंडपात दोन महिलांशी केलेल्या बहुचर्चित विवाहाचा मुद्दा आता संसदेपर्यंत पोहोचल्याचे दिसुन आले आहे. हा विवाह भारतीय संस्कृतीसाठी धक्कादायक असून असे विवाह रोखणारा कोणताही नियम किंवा कायदा अस्तित्वात नाही. अशा विवाहासाठी नियम, कायदे तयार केले जावेत, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी काल लोकसभेमध्ये केली आहे.

सोलापूरच्या अकलूज तालुक्यात अतुल अवताडे या तरुणाने जुळ्या बहिणींशी एकाच मंडपात विवाह केल्यानंतर ही घटना सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती. या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. तर राज्य महिला आयोगानेही नोटीस बजावली होती. तर चौकशीसाठी अकलूज पोलिसांनी दाखल केलेली याचिका सोलापूरच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर या त्रिकूटांना दिलासा मिळाला आहे.

याच पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करून या प्रकारांची पुनरावृत्ती रोखणारे नियम, कायदे तयार करावेत अशी मागणी केली आहे. खासदार नवनीत राणा म्हणाल्या, की महाराष्ट्रातल्या सोलापूरमधील घटना हिंदू संस्कृतीवर डाग लावणारी आहे. एका व्यक्तीने एकाच मंडपात दोन महिलांशी विवाह केला आहे. भारतीय दंड संहितेची 494 तसेच 495 कलमे आहेत. परंतु एका मंडपात दोन महिलांशी विवाह करण्याला रोखणारा असा कोणताही नियम किंवा कायदा नाही. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कायदा तयार केला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला उत्साहात सुरुवात, बाप्पाचे देखणे रूप पाहण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT