Ajit-Pawar 
महाराष्ट्र बातम्या

पक्ष सोडलेल्यांना थारा नाही - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

पुणे  - पक्ष सोडून गेलेल्यांना पक्षात घेऊ नका, तसा शब्दही त्यांना देऊ नका, अशी ताकीद देत पक्षविरोधी कारवायांना थारा देणार नसल्याचे ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले.

‘ही मंडळी कार्यक्रमात येतील तेव्हा, मला सांगा मी लगेचच त्यांना बाहेर काढेल,’ असा शब्दही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. खडकवासल्यात पाडापाडीचे राजकारण झाले, धनकवडीतून साथ मिळाली असती तर तिसराही आमदार झाला असता, याकडे लक्ष वेधत पवार यांनी काही पदाधिकाऱ्यांना दम भरला.

पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात पवार यांनी मोकळेपणाने भाषण करीत कार्यकर्त्यांना बोलके केले. विधानसभा निवडणुकीतील पुण्यातील यशापयश मांडताना स्वपक्षातील पक्षांतर्गत कुरघोड्यांवरही त्यांनी बोट ठेवले. निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखा झंझावात काँग्रेस पक्षाने निर्माण केला असता, तर राज्य जिंकता आले असते, असे सूचक विधानही पवार यांनी केले. 

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी दोषींना २१ दिवसांत कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. ज्यामुळे अत्याचार करणाऱ्यांवर धाक राहील. त्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि अन्य सहकाऱ्यांशी बोलून लवकर कार्यवाही केली जाणार असल्याचेही पवार 
यांनी सांगितले,.

‘काहीजणां’बाबत निर्णय योग्यच
पक्षविरोधी कारवाया केलेल्यांना आता पक्षात स्थान नसल्याचे सांगतानाच काही लोकांबाबत वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला निर्णय मान्य करावा लागेल. ‘मध्यंतरी पक्षाध्यक्ष शरद पवार आणि जयंत पाटील यांनी तशी भूमिका घेतल्यानेच मी आज तुमच्या पुढे उभा आहे,’ अशी कुबली पवार यांनी देताच सभागृहात प्रचंड हशा पिकला. त्यावर टाळ्या वाजवून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आमदारांना चांगले काम करता यावे, यासाठी त्यांच्याकडील अतिरिक्त जबाबदारी काढण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांनो सावधान! आठव्या वेतन आयोगाच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम; सरकारकडून आवाहन

Pune Crime : आरोपींची भूमिका गौण असल्याचा दावा दिशाभूल करणारा, शरद मोहोळ खून प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तिवाद; चार आरोपींचा जामिनासाठी अर्ज

खरे मूर्ख तर आम्ही... अंकिता वालावलकरने सांगितली सुरजची स्ट्रॅटेजी; त्याने स्वतःला मुद्दाम गरीब दाखवलं...

Maharashtra SSC Exam 2026: दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात; विद्यार्थ्यांनो, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Latest Marathi News Live Update : भुसावळमध्ये शिवजयंती उत्साहात; पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक

SCROLL FOR NEXT