farmer 
महाराष्ट्र बातम्या

Farmers Long March : शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ उद्या घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट?

सकाळ डिजिटल टीम

नाशिक - महाराष्ट्रातील हजारो शेतकरी आपल्या मागण्यांची यादी घेऊन मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. बुधवारी ड्रोन कॅमेऱ्यात विविध भागांतून जात असतानाची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व सीपीएमने केले आहे. हा मोर्चा २०० किमीचे अंतर पार करून मुंबईत दाखल होणार आहे. त्याआधीच मोर्चाला रोखण्यासाठी एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे.

शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे हे मोर्चेकऱ्यांशी मध्यस्थी करण्यासाठी शहापुरात दाखल झाले होते. शहापुरच्या तहसील कार्यालयात दोन्ही मंत्र्यांनी आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. मात्र शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावण्यासाठी ठाम आहेत. त्यातच आता उद्या दुपारी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं समजतं. याबाबत साम टीव्हीने वृत्त दिलं आहे.

या मोर्चात शेतकऱ्यांबरोबरच असंघटित क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते, आशा कार्यकर्त्या, आदिवासी समाजातील सदस्य सहभागी झाले आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.

कांद्याला रास्त भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात बुधवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली होती. राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी पायी चालणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा करावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. त्यानुसार आज मंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT