KEM Hospital
KEM Hospital sakal mumbai
महाराष्ट्र

राज्यात देहदानाच्या चळवळीतील पहिले पाऊल; त्वचादानाबाबतचे आशादायी चित्र

भाग्यश्री भुवड

मुंबई : मृत्यूनंतर देहरूपाने उरलेल्या एखाद्याचा उपयोग होऊ शकतो, हे आधुनिक वैद्यकशास्त्राने (Modern medicine) सिद्ध केले आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सहा तासांत त्याची त्वचा दान करता येते. त्यानंतर त्वचेतील प्रक्रिया केलेल्या ऊती पुढे पाच वर्षांपर्यंत साठवून ठेवता येतात. त्वचादानाबाबतचे (Skin donation) हे आशादायी चित्र आहे. ते प्रत्यक्षात आणायचे झाल्यास नागरिकांमध्ये त्याविषयी अधिकाधिक जागृती आणणे आवश्यक आहे, अशी तळमळ अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी (Medical experts) व्यक्त केली आहे.

पालिकेच्या वैद्यकीय विभागाने यासाठी प्रयत्नांना गती दिली आहे. ऊती प्रत्यारोपण हा उपचार पद्धतीतला क्रांतिकारक टप्पा आहे. पश्चिम भारत, अर्थात महाराष्ट्रात केईएम या रुग्णालयाची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. जतनाच्या उद्देशाने मृताच्या शरीरातील वेगवेगळे अवयव कसे काढावेत, त्यांची साठवणूक, त्यानंतर ऊती प्रत्यारोपण कशी करावी, याविषयीचे प्रशिक्षण डॉक्टरांना दिले जाणार आहे. यालाच इंग्रजीत ‘कॅडेव्हर ट्रेनिंग’ म्हणतात. म्हणजे शव-प्रेताविषयीची कला.

रोटो-सोटो पश्चिम विभागाचे सह-संचालक डॉ. आकाश शुक्ला म्हणाले की, सध्या १० ते १२ रुग्णालयांत अवयवदान आणि प्रत्यारोपण केले जात आहे. त्याविषयीचे प्रशिक्षण सर्व डॉक्टरांना दिले जाईल. यावर समिती सचिव डॉ. रवींद्र देवकर म्हणाले, की ‘रोटो-सोटो’ समितीमार्फत अवयवदान आणि प्रत्यारोपण कार्यक्रमांची संख्या वाढवली जाईल. इतर राज्यांत ही चळवळ गतिमान आहे.

पश्चिम भारतातील पहिली ऊती प्रयोगशाळा केईएममध्ये मार्च अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. ‘रोटो- सोटो’अंतर्गत या प्रयोगशाळेतील नव्या शीतगृहाचे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या हस्ते नुकतेच उद्‍घाटन करण्यात आले. येत्या मार्चअखेरीस ही प्रयोगशाळा सुरू होणार असून तिच्यात सध्या केवळ दोन शव ठेवता येतील, इतकी क्षमता आहे.

कार्यक्रमांची संख्या वाढवणार

राज्यातील अवयवदान आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया इतर राज्यांच्या तुलनेत तितकीशी वेगवान नाही. या चळवळीतील कमतरता दूर करण्यासाठी न्यायवैद्यक सल्लागार समिती मंथन करीत असते. रिजनल ऑर्गन ट्रान्स्प्लांट ऑगनायझेशन आणि स्टेट ऑर्गन ट्रान्स्प्लांट ऑर्गनायझेशन अर्थात रोटो-सोटो यांच्या पुढाकाराने केईएम रुग्णालयात नव्या शीतागार उभारण्यात येत आहे. उणे १४ अंश सेल्सिअस तापमानाखाली शीतागारात मृतदेह जतन केले जातील. त्यानंतर त्यांचा प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी (रिट्रायव्हल वर्कशॉप) वापर केला जाईल. शवकला अर्थात ऊती प्रयोगशाळेत रोज वेगवेगळ्या अवयवांसाठी कार्यशाळा घेतल्या जातील. त्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाईल. यात सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांचा समावेश आहे. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल.

प्रक्रिया काय?

- प्रत्यारोपणासाठी कार्टिलेज, हाड आणि हृदयाच्या ऊती घेतल्या जातील. यात मृताच्या त्वचेच्या ऊती असतील. ऊतीसंवर्धनात ग्लिसरॉल प्रक्रियेचा उपयोग केला जाईल.
- प्रयोगशाळेत शस्त्रक्रिया कक्ष, त्वचापेढीची सुविधा
- मूत्रपिंड यकृत, हृदय, हात इत्यादी अवयवासंदर्भात शल्यचिकित्सकांसाठी ऊतींचा नव्याने वापर करण्याविषयी कार्यशाळा

ऊतींना वाढती मागणी आहे. परिणामी त्याची साठवणूक करता येत नाही. मृत्युपश्चात त्वचादान करण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे.
- डॉ. विनिता पुरी, प्लास्टिक सर्जरी विभागप्रमुख

नवे शीतागार हे या प्रयोगशाळेतील एक भाग आहे. अवयवदानासंबंधी आदर्श मार्गदर्शक प्रणाली तयार केली जाईल.
- डॉ. सुजाता पटवर्धन ‘रोटो-सोटो’ संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT