Tomorrow schools in the state will continue though Workers bandh in the country 
महाराष्ट्र बातम्या

उद्या देशात बंद पण, राज्यातील शाळा मात्र....

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशभरातील कामगार संघटनांनी उद्या (ता.8) बंद पुकारला असला, तरी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा सुरू राहतील, असे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. राज्यातील काही शालेय शिक्षक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. मात्र, या संघटनांचे सदस्य काळ्या फिती लावून काम करणार आहेत. 


कामगार संघटनांनी पुकारलेल्या 'बंद'मुळे उद्या शाळांना सुटी आहे का, याबाबत पालकांकडून विचारणा केली जात होता. याबद्दल राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्याशी 'सकाळ'ने संपर्क साधला. ते म्हणाले, "कामगार संघटनांच्या बंदमध्ये संपूर्ण सहभागाचे पत्र शिक्षक वा कर्मचारी संघटनांकडून संचालनालयाकडे आलेले नाही. त्यामुळे शाळा बंद राहण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नाहीत. उद्या नेहमीप्रमाणे शाळा सुरू राहतील.'' 
पुणे न्यायालयाचे उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात समन्स, कारण

शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी, पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळेला सुट्टी घोषित केलेले नाही. सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र गायकवाड याबाबत म्हणाले, "आमची संघटना बंदमध्ये सहभागी नाही. सर्व मुख्याध्यापक नियमितपणे शाळेवर हजर असतील. शाळाही सुरू राहतील.''

Video : पुण्यात अभविप कार्यालयाच्या नामफलकाला फासले काळे
 
जनता शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले, की टटआमच्या संघटनेने या 'बंद'ला पाठिंबा दिला आहे. परंतु कोणीही कामावर गैरहजर राहणार नाही, तर काळ्या फिती लावून काम करणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! खडकवासला धरण ८१% भरले; कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात

'वडील मुख्यमंत्री आहेत म्हणून याला…', टोमणे मारणाऱ्यांना रितेश देशमुखनं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला...

Konkan Pune Highway : कोकण-पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क तुटला! ताम्हिणी, भोर अन् आंबेनळी घाट बंद झाल्याने चाकरमान्यांवर मोठे संकट; शेकडो किलोमीटरचा मारावा लागणार वळसा!

Krishna River Flood : कोल्हापूर-सांगलीत मुसळधार! नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरात पूरस्थिती; पाहा यंदाचा पहिला 'दक्षिण द्वार सोहळा', भाविकांची अलोट गर्दी

IND vs ENG, 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचा फलंदाजी क्रमांक बदलणार, तर बिश्नोई संघातून आऊट? कशी असू शकते भारताची प्लेइंग-११

SCROLL FOR NEXT