Toolkit Case News  
महाराष्ट्र बातम्या

टुलकिट प्रकरण: वाॅरंट नसताना दिल्ली पोलिसांनी घरातील साहित्य जप्त केले, शंतनू मुळूकच्या वडिलांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

सकाळ डिजिटल टीम

बीड : येथील चाणक्यपुरीतील रहिवाशी शंतनू मुळूक याच्याविरोधात टुलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (ता.16) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केले आहे. शंतनू याने जामीन अर्जासाठी अर्ज केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली व त्याला जामीन मंजूर झाला आहे. शंतनू याचे वडील शिवलाल मारुतीराव मुळूक यांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे.


निवेदनात म्हटले आहे, की 12 फेब्रूवारी रोजी घरी दोघे व्यक्ती आले व त्यांनी स्वतः दिल्ली पोलिस असल्याचे सांगितले. आम्हाला शंतनूची चौकशी करावयाचे म्हणाले. त्याने देशद्रोह केला आहे व तो खलिस्तानी लोकांच्या संपर्कात आहे असे म्हणून त्या दोन व्यक्तींना घरामधील सर्व खोल्यांची झडती घेतली व घरातून काँप्युटरची एक हार्डडिस्क, शंतनूच्या रुममधील एक पर्यावरणाविषयी पोस्टर, मोबाईलचे कव्हर व एक पुस्तक अशा चार वस्तू जप्त केल्या. पुढे ते म्हणतात, की हे सर्व करित असताना दिल्ली पोलिसांनी शोध अथवा जप्ती संदर्भातील कसलेही वाॅरंट दाखवले नाही.

तसेच जप्त केलेल्या वस्तूंचा कसलाही पंचनामा केला नाही व त्या घेऊन जाताना आमची कसलीही सहमती देखील घेतली नाही व वस्तू आम्ही तुम्हाला परत करु, असे म्हणून निघून गेले. परंतु 12 फेब्रूवारी पासून ते बीडमध्येच थांबलेले आहेत. अधून-मधून चौकशी कामी म्हणून शासकीय विश्रामगृहात बोलावून घेत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून विविध वृत्त वाहिन्यांवर मुलाचे नाव घेऊन बातम्या येत आहेत. यात आमच्या मुळाने फार मोठ कट केला आहे, असे वारंवार सांगितले जात आहे.

त्यामुळे 12 फेब्रूवारी रोजी घरी घडलेला प्रकार स्थानिक पोलिस प्रशासनास सांगणे आवश्यक वाटत असल्याचे ते म्हणतात. कारण त्या व्यक्तींच्या सोबत त्या दिवशी अथवा त्या नंतर कधी कुठलाही स्थानिक प्रशासनातील व्यक्ती नव्हता. हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चर्चिले जात आहे. त्यामुळे एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून घडलेला प्रकार कळविणे गरजेचे वाटते. तरी आपण घडलेल्या प्रकाराची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी,  ही विनंती शिवलाल मुळूक यांनी पोलिस अधीक्षकांकडे केला आहे.      

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT