Onion traders and officials of the district participated in the meeting held on Friday esakal
महाराष्ट्र बातम्या

Onion Traders Protest : राज्यातील व्यापारी 26 नंतर बंदमध्ये सहभागी होणार! लिलाव बंदचा कांदा व्यापाऱ्यांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Onion Traders Protest : शेतकरी हितासाठी सोमवार (ता. २५)पासून व्यापारी आपल्याकडील कांदा लोडिंग करणार नसून मंगळवारी (ता. २६) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठोस निर्णय होईपर्यंत व्यापाऱ्यांनी पुकारलेले लिलाव बंद आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे.

२६ सप्टेंबरच्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यातील व्यापारीही बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली.

कलंत्री लॉन्सवर शुक्रवारी (ता. २२) जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनची बैठक झाली. खंडू देवरे अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांतील ४५० च्या वर कांदा व्यापारी बैठकीला उपस्थित होते.

तसेच शेजारच्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही या वेळी सहभाग नोंदविला. बैठकीत आपले आंदोलन कायम ठेवण्यासह शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद आंदोलन सुरू केल्याने कांदा लिलाव ठप्प असून, संपूर्ण जिल्ह्यातील बाजार समितीत तीन दिवसांपासून कांद्याची सुमारे ५० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. गुरुवारी (ता. २१) पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने सर्वांच्या नजरा येवला येथे आज होणाऱ्या बैठकीकडे लागल्या होत्या.

बैठकीत केंद्र शासनाने कर्नाटक व आंध्र प्रदेशातील कांदा निर्यातीला ४० टक्के निर्यातमूल्य न लावता परवानगी देत असताना महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यात मूल्य लावत असल्याने हा दुजाभाव कांदा व्यापारी सहन करणार नाही.

केंद्र सरकारच्या दुजाभावामुळे महाराष्ट्रात कांद्यावरील निर्यातीमुळे कांदा व्यापारी शेतकऱ्यांच्या कांद्याचे लिलाव करू शकत नसल्याने हा निर्णय जोपर्यंत मागे घेतला जात नाही तसेच केंद्र सरकारने निर्यात मूल्यावर जी कर्नाटक व आंध्र प्रदेशाबाबत वेगळी भूमिका घेतली आहे, त्यावर टीका करत महाराष्ट्राबाबत वेगळा निर्णय जोपर्यंत बदलला जात नाही, तोपर्यंत लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.

२६ तारखेला मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, बैठकीत काही ठोस निर्णय होऊन कांदा व्यापारी संघटनेने केलेल्या मागण्या मान्य झाल्या, तर कांदा व्यापारी लिलावात सहभागी होतील; अन्यथा व्यापारी बेमुदत संपात सहभागी होणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बैठकीला सोहनलाल भंडारी, संतोष अट्टल, प्रवीण कदम, जितू कापडणीस, अतुल गाडे, नंदू अट्टल, सचिन मुथा, मनीष बोरा, रामेश्वर कलंत्री आदींसह जिल्ह्यातील कांदा व्यापारी उपस्थित होते.

२६ च्या बैठकीवर सर्व काही अवलंबून : देवरे

आजच्या बैठकीत जिल्ह्यातील व्यापारी बांधवांसोबत चर्चा झाली. शेतकरी बांधवांनी आक्षेप घेतला होता. मात्र शेतकरी हितासाठी आमच्याकडे असलेला माल आम्ही लोडिंग करणार नाही.

आजच्या बैठकीत २६ तारखेला काय मुद्दे मांडायचे, याबाबत चर्चा झाली असून, आमचे मुद्दे मान्य झाले नाहीतर राज्यातील व्यापारी पाठिंबा देणार आहे. ‘नाफेड’चा बफर स्टॉक आणि निर्यात शुल्काबाबत आम्ही ठाम असून, मार्केट फी एक रुपयावरून ५० पैसे करण्याची मागणी आहे.

शेतकऱ्यांकडे जर कांदा असेल, तर ते बाहेरच्या राज्यात जाऊन विकू शकता. आम्ही आंदोलनावर ठाम असून, आता २६ तारखेच्या बैठकीनंतरच सर्वकाही ठरेल, असे बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष खंडू देवरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT