Anil parab Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

अनिल परब आज ED चौकशीला हजर नाही राहणार

अनिल परब यांचे वकिल आज ED च्या कार्यालयात जातील.

वैदेही काणेकर

मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांना ED ने चौकशीसाठी नोटीस (notice) बजावली आहे. पण परिवहन मंत्री अनिल परब आज ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाहीत. त्याऐवजी परिवहन विभागाच्या (transport dept) पथकासाठी वाहनांच्या लोकार्पणाचा कार्यक्रमाला हजर राहणार असल्याची माहिती आहे.

ED ने बजावलेल्या नोटीस मध्ये नेमक्या कोणत्या प्रकरणाची चौकशी करायची आहे, याचा स्पष्टं उल्लेख नाहीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री अनिल परब हे स्वत: आज ED च्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार नाहीत. त्या ऐवजी अनिल परब यांचे वकिल आज ED च्या कार्यालयात जातील.

ED ने बजावलेल्या नोटीस संदर्भात कोणती चौकशी होणार आहे, याची माहीती ED च्या अधिकाऱ्यांना वकिलाकडून विचारण्यात येईल. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब कायदेशीर सल्ला घेऊन पुढचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आज परिवहन मंत्री अनिल परब ED च्या कार्यालयात जाणार नाहीत. परिवहन मंत्री अनिल परब यांचे पूर्व नियोजित कार्यक्रम आज मुंबईत होणार आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमध्ये अनिल परब भूमिका बजावत असल्याचे एका व्हिडीओमधून दिसले होते. तेव्हापासूनच, अनिल परब यांना टार्गेट करण्यात येईल, अशी चर्चा होती. अखेर दोन दिवसांपूर्वी अनिल परब यांना ED कडून नोटीस मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

युद्धामुळे महागाईचा भडका, सरकारने एक कोटीची नोट छापली, पण बाजारात पिशवीही भरणार नाही; इराणची अर्थव्यवस्था संकटात

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

SCROLL FOR NEXT