वानरलिंगी सुळका Sakal
महाराष्ट्र बातम्या

वानरलिंगी सुळका सर करून सिंधुताई सपकाळ यांना अनोखी मानवंदना

सुळक्याच्या टोकावर पोहचून सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहून तिरंगा फडकविला.

अमित गवळे: सकाळ वृत्तसेवा

पाली : सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना सुधागड तालुक्यातील मॅकविला द जंगल यार्ड मधील साहसी प्रस्तरारोहकांनी अनोखी गिर्यारोहण मानवंदना दिली आहे. शुक्रवारी (ता.7) पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वानरलिंगी हा 400 फूट सुळका सर केला. सुळक्याच्या टोकावर पोहचून सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि गिर्यारोहण मानवंदना देण्यात आली. तसेच भारताचा झेंडा फडकवण्यात आला.

या मोहिमेत सुधागड तालुक्यातील प्रस्तरारोहक व 'मॅकविला द जंगल यार्ड' चे संस्थापक मॅकमोहन हुले आणि त्यांचे सहकारी प्रणय पाटील, अभिजीत राजगुरू व विकी घोडके हे सहभागी होते. गुरुवारी (ता.6) रात्री ९ च्यासुमारास आपल्या 70-80 लिटर बॅकपॅक सहित मोटार सायकलवरून जुन्नरला पोहचले. शुक्रवारी (ता.7) सकाळी 11 वाजता सुळक्याजवळ पोहोचले.

दुपारी एक वाजता वानरलिंगी सुळका प्रस्तारोहन चालू केले. मॅकमोहन यांनी प्रथम प्रस्तरारोहणाला सुरुवात केली. त्यांना सुरक्षा दोर प्रणय पाटील यांनी दिला. अनेक मोहीमांचा अनुभव असलेल्या या गिर्यारोहकांनी सुरक्षितेचे भान ठेवून चार तासात हा सुळका सर केला. व तेथे सिंधुताईंना अनोखी श्रद्धांजली व गिर्यारोहण मानवंदना दिली.

कठीण चढाई

वानरलिंगी या सुळक्याने प्रस्तरारोहक, गिर्यारोहक आणि साहस प्रेमींसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. 1983 मध्ये मुंबईच्या गिर्यारोहक क्लबने प्रथम प्रस्तरारोहण केले होते. हा सुळका सरळ ९० अंश कोनात ताठ मानेने उभा आहे. या सुळक्याची प्रस्तरारोहण श्रेणी अतिशय कठीण आहे. येथे चढाई करतांना नेहमीच रॉक क्लाइंबिंग उपकरणांचा संपूर्ण संच सोबत ठेवावा लागतो. असे ” 'मॅकविला द जंगल यार्ड' चे संस्थापक मॅकमोहन यांनी सकाळला सांगितले.

सिंधुताईंचे कार्य महान आहे. त्यांच्या जाण्याने अनाथांची माय हरपली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या दैदिप्यमान कार्याला सलाम करण्यासाठी ही अनोखी मानवंदना देण्यात आली.

-मॅकमोहन हुले, संस्थापक, 'मॅकविला द जंगल यार्ड'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election : निवडणूक प्रचारासाठी गजानन मारणेला पुण्यात प्रवेश; उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी!

Ayurvedic Warning: दह्यासोबत 'हे' 5 पदार्थ खाल्ल्यास पोटात तयार होतं विष, वेळीच व्हा सावध

Pune municipal corporation election: पुण्यात भाजप उमेदवाराला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न; भीमनगर परिसरातील घटना

Latest Marathi News Live Update : धुळे महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा फाडला बॅनर

Ichalkaranji Election : वस्त्रोद्योगाच्या प्रश्नांना गती देण्याचे आश्वासन; इचलकरंजीत आवाडेंची ठाम भूमिका

SCROLL FOR NEXT