Inflation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Inflation: तूरडाळीचे भावही भिडणार गगनाला; स्वयंपाकघराचे ‘बजेट’ कोलमडणार?

Inflation: ठोक बाजारात सध्या तूरडाळ १६५ रुपये किलो तर किरकोळ बाजारात १८० ते १८५ रुपये किलो आहे. मात्र, येत्या दोन महिन्यांत तूर डाळ २१० ते २२० रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर: साखर, धान्य, तांदूळ, खाद्यतेलापाठोपाठ आता तूरडाळ, कडधान्य, मूग आणि उडीद डाळीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे वरणभात, कडधान्यांची उसळ करताना गृहिणींना विचार करावा लागणार आहे. ठोक बाजारात सध्या तूरडाळ १६५ रुपये किलो तर किरकोळ बाजारात १८० ते १८५ रुपये किलो आहे. मात्र, येत्या दोन महिन्यांत तूर डाळ २१० ते २२० रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या दरवाढीमुळे ‘किचन बजेट’ मात्र कोलमडून जाणार आहे.

सलग दोन वर्षांपासून तुरीला अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे तूर डाळीचे भाव सतत वाढत असून ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर खाद्यतेलासह डाळीचे भाव कमी ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठे प्रयत्न झाले होते. मात्र, त्याला ब्रेक लागला आहे. कारण पाम तेल उत्पादक देश असलेल्या इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यात शुल्कात वाढ केली आहे. तसेच तूर डाळीचे उत्पादन पावसामुळे कमी झाल्याने दरात सतत वाढ होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तूर डाळ ४० टक्के वाढलेली आहे.

मूगडाळीचा शिरा महागणार

तूरडाळी पाठोपाठ मूगडाळीचे दरही वधारले आहेत. मुगाची डाळ ठोक बाजारात १०८ ते १२२ रुपये किलो या दराने विक्री होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो मूगडाळीसाठी ग्राहकांना १४० ते १४५ रुपये मोजावे लागत आहेत. तसेच उडीद मोगरचे भावही वाढले असून प्रतिकिलो ठोक बाजारात १३०ते १३६ रुपये भाव असून किरकोळ बाजारात १५० रुपयांवर गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT